1kg Biryani ला किती प्रमाणात मसाला लागतो??

विशेष….biryani हे सर्वांना आवडणारी ( favourite dish ) आहे.बिर्याणी ही भारतातील आणि दक्षिण आशियातील एक अतिशय लोकप्रिय, स्वादिष्ट आणि सुगंधी डिश आहे. ती प्रामुख्याने तांदूळ, मांस/भाजीपाला, मसाले आणि तुप यांचा उत्तम संगम असते. बिर्याणीची खासियत म्हणजे तांदळामध्ये मसाले, मांस/भाजीपाला थर-थराने लावून दमवर (हळू आचेवर झाकून) शिजवणे.
बिर्याणी ला मसाला लागणारा प्रमाण –

बिर्याणी कुठलीही असो veg किंवा non-veg, प्रत्येक बिर्याणी प्रमाण त्याच्या quantity अनुसार आपण मसाले टाकतो. बिर्याणीला मसाला पण घरून किंवा बाहेरूनही आणू शकतो.
✳️बिर्याणीतील लागणारे साहित्य=
•बासमती तांदूळ
•मटण, चिकन, मासे किंवा भाज्या
•दही, तूप, तेल
•कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट
•बिर्याणी मसाला (जायफळ, जावित्री, दालचिनी, वेलची, लवंग, मिरी, तेजपत्ता)
•कोथिंबीर, पुदिना
•केशर (दुधात भिजवलेले)
मसाला प्रमाण / Masala Quantity
1-kg बिर्याणी साठी = 25gm-35gm
2-kg बिर्याणी साठी = 35gm-50gm
5-kg बिर्याणी साठी = 100gm-125gm
✳️बनवण्याची पद्धत (थोडक्यात)
- तांदूळ अर्धवट शिजवून घ्यावे.
- मांस/भाजी मसाल्यात शिजवून तयार करावे.
- एका भांड्यात थर लावणे – तांदूळ, मग मांस/भाजी, पुन्हा तांदूळ.
- वरून तूप, केशर दुध, पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा टाकावा.
- झाकण लावून मंद आचेवर 20-25 मिनिटे दम द्यावा.
✳️मग तयार होते बिर्याणी…….
Now ready to eat Biryani…

✳️मुख्यतः भारतीय प्रांतामध्ये बिर्याणीच्या अनेक प्रकार आहेत…. In india various types of biryanis
बिर्याणीचे मुख्य प्रकार
- हैदराबादी बिर्याणी – भारतातील सर्वात प्रसिद्ध बिर्याणी; यात बासमती तांदूळ, मटण/चिकन, दही, तळलेला कांदा आणि मसाले वापरले जातात.
- लखनवी (अवधी) बिर्याणी – सौम्य मसालेदार, अधिक सुगंधी, प्रामुख्याने केशर आणि गुलाबपाणी वापरले जाते.
- कोलकाता बिर्याणी – अंडे व बटाट्याचा वापर ही याची खास ओळख.
- मलबार बिर्याणी – केरळमध्ये लोकप्रिय, नारळ तेल, मसाले व समुद्री खाद्य वापरले जाते.
- वेज बिर्याणी – मांसाऐवजी विविध भाज्या, पनीर किंवा सोयाबीन वापरले जाते.
आज बिर्याणी केवळ भारतातच नाही तर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, मध्य पूर्व, युरोप आणि अमेरिकेतही अतिशय लोकप्रिय आहे. ती भारतीय खाद्यसंस्कृतीचे जागतिक प्रतीक मानली जाते…
बिर्याणी चा इतिहास ( Histroy of biryani )
✳️बिर्याणी” हा शब्द फारसी भाषेतील “बिरियन” (Biryān) या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ शिजवण्याआधी भाजणे असा होतो.
असे मानले जाते की बिर्याणीची संकल्पना इराण–मध्य आशिया येथे सुरू झाली आणि व्यापारी व बादशहांमार्फत भारतात आली.
Zakastimes.Com

