Categories
Health

5-tips for zakas health: आरोग्यदायी जीवनासाठी 5 टिप्स

आयुष्य जगत असताना आरोग्याची काळजी घेणे हे सर्वप्रथम प्रत्येकांचे जबाबदारी असते, आरोग्य असेल तर सर्व गोष्टी सुखरूप असतात. आरोग्य: म्हणजे शरीर, मन आणि समाज यांचा समतोल साधणे. निरोगी राहण्यासाठी केवळ आजार नसणे पुरेसे नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे असते. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे कमी झाले आहे. आपल्या जीवनशैलीत, आहारात आणि दैनंदिन सवयींमध्ये केलेले छोटे-छोटे बदल जे दीर्घकाळासाठी शरीर आणि मन निरोगी ठेवतात. या गोष्टीकडे लक्ष ठेवत सरकारनेही जनते साठी अनेक योजना काढले आहेत जसेकी – महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री आयुष्मान आरोग्य योजना. आरोग्य म्हणजे शरीर, मन आणि सामाजिक जीवन यांचा समतोल व निरोगी अवस्था. काय सवयी जे ठेवतील तुम्हाला आयुष्यभर निरोगी. 

1. संतुलित आहार.
2. नियमित व्यायाम/योगा.
3. पुरेशी झोप.
4. पाणी भरपूर पिने.
5. ताण कमी ठेवा.

1. संतुलित आहार:

आरोग्य
संतुलित आहार

संतुलित आहारामध्ये 5 अन्न गटातील विविध पदार्थ योग्य प्रमाणात खाणे समाविष्ट असते. यात कर्बोदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरसह संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो.

आरोग्य
समतोल आहार


योग्य प्रमाण आणि आहारातील समतोल राखणे, तसेच पर्याप्त मात्रेत भाज्या आणि फळांचे सेवन करणे हे संतुलित आहाराचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. दररोज विविध फळे आणि भाज्यांचे आहार घ्यावा.

संतुलित आहाराचे प्रमाण

अर्धा भाग फळे आणि भाज्या

एक चतुर्थांश प्रथिने

एक चतुर्थांश धान्य

यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्ती आणि पोषण मिळते.

नियमित व्यायाम / योगा कारणे!!!

आरोग्य
व्यायाम करणे

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगा केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि मन निरोगी राहते. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, वजन नियंत्रित राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर योगामुळे मानसिक ताण कमी होतो, लवचिकता वाढते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

पुरेशी झोप घेणे :

झोपे झाल्यामुळे शरीराला आवश्यक विश्रांती मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते व आजारांपासून बचाव होतो. हृदयाचे आरोग्य चांगले राहते झोपेमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो व हृदयविकाराचा धोका कमी होतो. झोपेमुळे त्वचेचा तेज टिकून राहतो, डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.

ताण कमी करणे!

Strees free

आजच्या धावपळीच्या जीवनामुळे मध्येय ताण हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे. आयुष्यामध्ये ताण असेल तर अनेक गोष्टीला आपण अडचनीत येतो जसे की मानसिक, शारीरिक अडचणी मध्ये वाढ होणे. ताण कमी करायचा असेल तर ध्यान साधना, नियमित योग्य व्यायाम, आवडणाऱ्या गोष्टी करणे यातून आपण ताण मुक्त होऊ शकतो. ताण मुक्त झाल्यानंतर आपणाला बरेचसे फायदे भेटतात जसेकी कौशल्यविकास, आत्मविश्वास वाढतो, ताण हाताळण्याचा सराव झाल्याने भविष्यातील कठीण प्रसंग अधिक सहज हाताळता येते.


आरोग्य टिकवण्याचे मूळ उपाय:

चांगले आरोग्य म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा योग्य समतोल राखणे. केवळ आजार नसणे एवढेच आरोग्य नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्त राहणे हेच खरे चांगले आरोग्य आहे….

भारतीययांच्या मुख्य आरोग्य समस्या!

हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, लठ्ठपणा, श्वसनाचे आजार, मानसिक आरोग्य समस्या असे अनेक मुख्य आरोग्य समस्या भारतीय यांच्या आहेत. यातला कुठलाही रोग आपल्याला जडला की आपण ताण, नैराश्य, चिंता आणि झोपेच्या समस्या या मोठ्या मानसिक आरोग्य समस्या आहेत व्हायला सुरुवात होते. आरोग्य समस्या कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, प्रदूषण नियंत्रण, ताण कमी करणे आणि जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे.

आरोग्य आणि निरोगीपणाच्या परिमाणांनुसार निरोगी जीवनशैली कशी राखता येईल?

निरोगी जीवनशैली ही केवळ शारीरिक आरोग्यावर आधारित नसून ती शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय या सर्व परिमाणांवर अवलंबून राहते. प्रत्येक परिमाणात संतुलन साधल्यास दीर्घकाळ चांगले आरोग्य ठेवता येते..

आरोग्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आहेत?

आरोग्य
चांगल्या सवयी

निरोगी जीवन जगण्यासाठी काही चांगल्या सवयी अंगीकारणे खूप महत्त्वाचे आहे. कारण त्या सवयी शरीरासोबतच मनाचेही आरोग्य वेवस्तीत ठेवते, धूम्रपान, मद्यपान आणि जंक फूडपासून दूर राहणे. दिवसभरात 7–8 ग्लास पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. हळूहळू जेवण कारणे, निरोगी पदार्थ खाणे, टाईमवरती झोप, सकाळी व्यायाम कारणे आणि रोजच्या व्यायामामुळे शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात. संतुलित जेवण खाणे हे आरोग्य साठी सवयी चांगले.

संपूर्ण धान्य (Whole Grains) खाणे हा आरोग्यासाठी उत्तम राहते!

Whole grains

आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते आणि संपूर्ण धान्य निवडणे हा नेहमीच सर्वोत्तम पर्याय असतो अर्थात “आपल्या शरीरासाठी कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात आणि त्यासाठी संपूर्ण धान्य (Whole Grains) खाणे हा आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे.”

Zakastimes.com

 

Categories
Health

Dry fruits benifits in Marathi:

Dry fruits वैशिष्ट्ये =

Dry fruits खाल्ल्याने ताकत आणि मेंदूची शक्ती वाढते असे मानले जाते. सुका मेवामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात तसेच स्मरणशक्तीची असो वा पचनशक्तीची, पोटातील गॅससंबंधित असो किंवा बद्धकोष्ठासंबंधित ड्राय फ्रुट्स उपाय म्हणून कार्य करत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ आहारात सुक्या मेव्यांचा समावेश करण्यावर विशेष भर देतात. Dry fruits खाल्ल्याने शरिरातील वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन होते…

Dry fruits : बदाम, काजू, अक्रोड, मनुका, अंजीर, खजूर व पिस्ता यांसारखे सुके मेवे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. नियमित प्रमाणात ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने भरपूर फायदे होतात. दवाखाना ला लाखों रुपये खर्च झाल्यानंतर आपण ड्राय फ्रुटस खायला लागतो. दवाखान्या येण्याच्या अगोदर आपण ड्रायफ्रूट खाण्यास चालू केलं तर अनेक फायदे आपल्या शरीरावरती होतात. ड्रायफ्रूट ( Dry fruits )  मध्ये अनेक गुणधर्म आहेत जसं की अँटिऑक्सिडंट, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी घटक असतात यातून आपणाला अनेक फायदे होतात, शरीरात ऊर्जा वाढवणे, हाडांची ताकद वाढवणे, रक्ताची वाढ व रक्ताची शुद्धीकरण करणे, शरीरात ताकदीचे प्रमाण वाढ करणे इत्यादी अनेक फायदे आपल्याला भेटतात…

मधुमेहासाठी सुक्या मेव्याचे फायदे (Diabetes Dry Fruits Benefits in Marathi)

मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांसाठी सुकामेवा हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास तो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. सुक्या मेव्यामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने मधुमेहासाठी तो लाभदायक ठरतो.

गर्भावस्थेत सुका मेवा खाण्याचे फायदे | Dry Fruits Benefits in Pregnancy in Marathi

गर्भावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ असतो. या काळात योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर व तज्ज्ञांच्या मते, सुका मेवा (Dry Fruits) हा गर्भवती महिलांसाठी पोषणाचा उत्कृष्ट स्रोत आहे. बदाम, काजू, अक्रोड, खजूर, अंजीर, मनुका इत्यादी सुका मेवा खाल्ल्याने आई व बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते.


प्रमुख Dry – fruits आणि त्यांचे फायदे:

Dry fruits

खजूर ( खारीक) :
ऊर्जा वाढवतात आणि शरीराला आवश्यक ऊर्जा देतात, तसेच पचन सुधारतात.

अंजीर :
फायबरचा चांगला स्रोत, जे पचनासाठी आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे

बदाम :
अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण, जे वृद्धत्व टाळण्यास मदत करते.

अक्रोड :
मेंदूच्या आरोग्यासाठी आणि संज्ञानात्मक कार्यासाठी फायदेशीर आहे.

पिस्ता:
लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांचा चांगला स्रोत आहे.

मनुका :
नैसर्गिक साखरेमुळे शरीराला त्वरित उर्जा मिळते. मनुका मुळे कोलेस्टेरॉल कमी ठेवण्यास मदत करते….


ड्रायफ्रूट खाण्याची पद्धत….


ड्रायफ्रूट खाण्याचे योग्य पद्धत म्हणजे रात्री सर्व ड्रायफ्रूट्स दुधात भिजवून खाण्याचे फायदे अनेक पटीने  फायदेशीर ठरते. अनशापोटी / रिकाम्या पोटी खाल्ल्याने भरपूर ऊर्जा व दिवसभरासाठी ताकद मिळते  dry fruits भिजून खाल्ल्याने त्यामध्ये पोषक तत्व जास्त वाढतात

   zakastimes.Com