शिवाजी पार्कमध्ये Rohit sharma batting करताना आज दिसला. शिवाजी पार्कमध्ये अनेक चाहते रोहित शर्माला बॅटिंग करताना पहिले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीसाठी तो नेट्समध्ये तुफान फटकेबाजी करताना दिसला. चाहत्यांना रोहितचा दमदार फॉर्म आणि त्याची क्लासिक टाइमिंग पुन्हा पाहायला मिळाली. रोहित शर्माने अनेक धडे शिवाजी पार्क या मैदाना मधून गिरवले तसेच अनेक खेळाडू आपले धडे मुंबई च्या शिवाजी पार्क मधून सुरुवात केलेले तसेच मुंबईतील शिवाजी पार्क हे भारतीय क्रिकेटचे जन्मस्थान मानले जाते.
Rohit Sharma batting: रोहित शर्मा बॅटिंग करताना त्याचा दमदार शॉट नी त्याचा लेंबोरगिनी गाडी च्या काच फुटला. या शॉट चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहितच्या फटक्याची ताकद पाहून चाहत्यांनी त्याच्या बॅटिंग पॉवरचे कौतुक केले. चहात्यानी बॅटिंगचा भरपूर आनंद घेतला.
रोहितच्या फॉर्ममध्ये परतण्याचे संकेतही या सरावातून दिसत आहेत. शिवाजी पार्कमधील ही घटना मुंबईतील क्रिकेटप्रेमींसाठी एक खास क्षण ठरला आहे.
टीममधून वनडे कर्णधारपद गेल्यानंतरही रोहितने स्वतःला पुन्हा सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. त्याच्या नेट प्रॅक्टिसमध्ये फिटनेस, शॉट सिलेक्शन आणि पॉवर हिटिंगवर विशेष भर दिसून आला. क्रिकेट विश्लेषकांच्या मते, रोहित पुन्हा एकदा मोठी इनिंग खेळण्यासाठी तयार आहे.
