Categories
झकास्टीम्स अपडेट्स

Diwali shopping online 2025 : अशाप्रकारे करा दिवाळीची ऑनलाइन शॉपिंग

महाराष्ट्रात दिवाळी हा सण फक्त धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. तसेच दिपवाली मध्ये Diwali shopping online करून या दिवाळीत आपल्या घरासाठी नवीन वस्तू, कपडे आणि भेटवस्तू खरेदी करून दिवाळी आणखीन विशेष बनवा. दिवाळी हा हिंदू , जैन आणि शीख धर्मातील प्रमुख धार्मिक सणांपैकी एक आहे. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही हा प्रत्येक व्यक्तीमधील परमात्म्याचा उत्सव आहे. दिवाळी हा सण अध्यात्मिक महत्त्व पटवून देणाराही आहे. दिवाळी ही भगवान महावीरांच्या आध्यात्मिक प्रबोधनाचे प्रतीक आहे.

Diwali shopping online 2025 मध्ये काय काय खरेदी करावे?

दीपावली या सणांमध्ये अनेक गोष्टी आपणाला लागतात जसं की घर सजवण्यासाठी (home decor) वस्तू, लाइट्स, रांगोळी, वॉल डेकोर, दिवे, कुशन कव्हर्स तसेच लक्ष्मीपूजन ला लागणारे साहित्य तसेच आपणाला लागणारे कपडे किंवा ॲक्सेसरीज आपण सहज पद्धतीने online shopping करून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट होऊ शकतात.

Diwali shopping online कशी करायची!!

Diwali shopping online करण्यासाठी अनेक ई-कॉमर्स वेबसाईट आहेत जसे की  Flipkart : Amazon : Myntra : Meesho या वेबसाईट वरती जाऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करून चांगल्या प्रमाणात ऑफर घेऊ शकतात.

दिवाळीचा आदर कसा करावा?

हा सण फक्त दिवे लावण्यापुरता नसून आपल्या परंपरेचा सन्मान, निसर्गाचा आदर आणि सामाजिक एकतेचा संदेश देतो. चला पाहूया दिवाळीचा आदर कसा करावा आणि हा सण अधिक अर्थपूर्ण कसा साजरा करावा;

परंपरेचा सन्मान कारणे
• पर्यावरणपूरक दिवाळी    साजरी करा
• समाजातील सर्वांना आनंद द्या
• परंपरेनुसार पूजा आणि मंत्रोच्चार करा
• लक्ष्मीचे स्वागत कारणे हा दीपावलीचा उद्देश आहे

Diwali decoration for home : दिवाळीसाठी घर कसे डिझाइन करावे?

Diwali shopping online
Diwali decoration

• दिवाळी पूजा परिसर कसा सजवायचा?

• लक्ष्मीपूजनात सजावट कशी करावी?

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि या सणात घराची सजावट (Diwali Decoration for Home) हे सर्वात महत्त्वाचे आकर्षण असते. आपले घर उजळवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी काही सोप्या पण आकर्षक सजावट कल्पना वापरून घराला चांगली डिझाईन देऊ शकतो.

सुरुवात करा घराची साफसफाई करून — कारण स्वच्छता हीच शुभतेची पहिली पायरी आहे. दरवाज्यावर सुंदर तोरण, रांगोळी आणि कंदील लावा. या पारंपरिक सजावटीमुळे घराला उत्सवाचा स्पर्श मिळतो. दिवाळीच्या रात्री घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तेलाचे दिवे किंवा LED दिवे लावल्यास घर प्रकाशमान होते आणि लक्ष्मी आगमनासाठी वातावरण निर्मिती होते….

दिवाळी पूजा परिसर कसा सजवायचा?

Diwali shopping online
Diwali pooja

प्रवेशद्वार आणि पूजा जागेवर सुंदर रंगीत रांगोळी काढा नंतर पूजा करण्यापूर्वी परिसर स्वच्छ करून गंगाजळ किंवा कापूर/ दुप लावून ठेवा हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. झेंडू, गुलाब, कमळ अशा ताज्या फुलांनी पूजा मंडप सजवा तसेच स्वयंपाकघरात आणि हॉलमध्ये फुलांची माळ, आरती थाळी डेकोरेशन, आणि लक्ष्मी-गणपती मूर्तीच्या आजूबाजूला सजावट केल्याने सणाचे सौंदर्य वाढते.

लक्ष्मीपूजनात सजावट कशी करावी?

लक्ष्मीपूजन या दिवशी घरात महालक्ष्मी, भगवान विष्णू आणि गणपतीची पूजा केली जाते हा दिवस सर्वात महत्त्वाचा समजला जातो. लक्ष्मीपूजन करताना  लाल, पिवळ्या किंवा केशरी रंगाचे रेशमी वस्त्र पूजा स्थळी अंथरा. मोगरा, झेंडू, गुलाब या फुलांच्या माळांनी दरवाजा आणि पूजा जागा सजवा. मूर्तीच्या  आजूबाजूला चांदीचे नाणे, तांदूळ, फुलं आणि फळं ठेवा. मग या गोष्टी करून तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता.

By Narsing Pawar

नमस्कार 🙏 मी Narsing pawar ZakasTimes ब्लॉग चा संस्थापक, लेखक आणि डिजिटल क्रिएटर आहे. मी एक Marathi Blogger, YouTuber आणि Entrepreneur असून वाचकांपर्यंत दर्जेदार, विश्वासार्ह आणि माहितीपूर्ण कंटेंट पोहोचवण्यावर आपला भर असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *