Categories
Health

लिव्हर खराब होण्याची लक्षणे आणि त्यावर उपाय!!!

लिव्हर शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. लिव्हर खराब होण्याची लक्षणे अनेक आहेत. लिव्हर (यकृत) हा  रक्तातील विषारी घटक फिल्टर करतो, पचनासाठी पित्त तयार करतो आणि उर्जेचा साठा ठेवतो. पण जेव्हा लिव्हर खराब होऊ लागतो, तेव्हा शरीरात काही लक्षणे दिसू लागतात जी वेळेवर ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. लिव्हर खराब झाल्यावर Liver Transplant केले जाते. लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर रुग्णाला औषधोपचार, नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैली राखणे अत्यावश्यक राहते.

लिव्हर सूज येण्याची कारणे!

लिव्हर खराब होण्याची लक्षणे
Liver

लिव्हर सूज (Liver Swelling किंवा Hepatomegaly) हा एक गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये लिव्हर सामान्यपेक्षा मोठा होतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. फॅटी लिव्हर, हर्पेटायटिस A, B किंवा C, मद्यपानाची जास्त प्रमाणात सवय, आणि जंक फूडचे जास्त सेवन हे मुख्य कारणे आहेत. तसेच मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, लिव्हरचे आजार किंवा औषधांचे साइड इफेक्ट्स देखील लिव्हर सूज निर्माण करतात. काही वेळा हृदयाची समस्या किंवा किडनीचे आजार देखील लिव्हर सूजास कारणीभूत ठरतात. लिव्हर सूज असल्यास डोकेदुखी, पोटात दुखणे, त्वचेवर पिवळसरपणा आणि थकवा जाणवतो. लिव्हर सूज टाळण्यासाठी संतुलित आहार, मद्यपान टाळणे, नियमित व्यायाम आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आवश्यक आहे.

फॅटी लिव्हर साठी घरगुती उपाय!!

लिव्हर खराब होण्याची लक्षणे
घरगुती उपाय

फॅटी लिव्हर हा आजकालचा सामान्य पण गंभीर आजार आहे. चुकीचा आहार, मद्यपान आणि निष्क्रिय जीवनशैली यामुळे लिव्हरमध्ये चरबी साठते. फॅटी लिव्हर साठी घरगुती उपायांमध्ये सर्वप्रथम संतुलित आहार घ्यावा. दररोज लिंबू पाणी, आवळा रस आणि हळदीचे दूध घेतल्याने लिव्हर शुद्ध राहते. ग्रीन टी आणि लसूण हे चरबी कमी करण्यात मदत करतात. तेलकट, तळलेले आणि जंक फूड टाळा. रोज 30 मिनिटे चालणे किंवा योगा केल्याने लिव्हरमधील चरबी कमी होते. पुरेसे पाणी प्या आणि मद्यपान पूर्णपणे बंद करा. तसेच आवळा, तुळस, कारल्याचा रस हे लिव्हर साठी नैसर्गिक टॉनिक आहेत. नियमित तपासणी करून आरोग्याची काळजी घ्या हे महत्वपूर्ण ठरते…


यकृताच्या समस्यांमुळे चेहरा फुगू शकतो का?

यकृताच्या समस्यांमुळे मुरुमे होतात का?

यकृताच्या आजारात त्वचेतील बदल कोणते असतात?

यकृताच्या नुकसानीमुळे त्वचा काळी पडू शकते का?

लिव्हर खराब होण्याची लक्षणे मुळे चेहरा फुगू शकतो का?

लिव्हर खराब होण्याची लक्षणे

Liver च्या समस्यांमुळे चेहरा फुगणे शक्य आहे. लिव्हर शरीरातील द्रव संतुलन नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा यकृत योग्य प्रकारे कार्य करत नाही, तेव्हा शरीरात अतिरिक्त द्रव साठतो, ज्यामुळे हात, पाय तसेच चेहरा सूजतो. याला फेशियल एडिमा असेही म्हणतात. यकृताचे गंभीर आजार जसे की सिरोसिस किंवा फॅटी लिव्हर हे देखील चेहर्‍यावर फुगण्याचे लक्षण देऊ शकतात.

लिव्हर दुषित झाल्यानंतर चेहरा फुगण्याची लक्षणे!!

• डोळ्यांच्या भोवती सूज

• गाल आणि कपाळावर सूज

• चेहर्‍यावर चमकदार किंवा फिकट त्वचा

• अंगात आणि पायांमध्ये साठलेला द्रव

यकृताच्या (liver) समस्यांमुळे मुरुमे होतात का?

लिव्हर खराब होण्याची लक्षणे
Pimples problem

लिव्हरच्या समस्यांचा थेट परिणाम त्वचेमध्ये दिसतो आणि यामुळे मुरुमे (Acne) होऊ शकतात. लिव्हवर हे शरीरातील मुख्य विषारी पदार्थ दूर करणारे अवयव आहे. जेव्हा लिव्हर व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा शरीरातील टॉक्सिन्स त्वचेतून बाहेर येतात. यामुळे त्वचा सडल्यासारखी दिसते, तैलकटपणा वाढतो आणि मुरुमे निर्माण होतात.

लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जास्त तेलकट, जंक फूड, अल्कोहोल व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. हिरव्या भाज्या, फळे, मसूर व दाल, ओट्स, नट्स व लिंबूयुक्त पाणी सेवन करा. पुरेशी झोप, व्यायाम आणि पुरेसे पाणी पिणे हे देखील यकृतासाठी फायदेशीर आहे.

यकृताच्या( liver) आजारात त्वचेतील बदल कोणते असतात?

लिव्हर खराब होण्याची लक्षणे
त्वचा बदल

यकृताच्या आजारांमुळे त्वचेत अनेक लक्षणे दिसू लागतात, कारण यकृत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे मुख्य कार्य करते. जेव्हा यकृत नीट काम करत नाही, तेव्हा टॉक्सिन्स त्वचेतून बाहेर येतात आणि त्वचेचा रंग, बनावट व आरोग्य प्रभावित होतात.

तुझ्या मध्ये दिसून येणार आहे बदल :

पिवळसर त्वचा होने

मुरुमे व डाग दिसणे

खवखवाट व कोरडेपणा होने

खुणा व पिग्मेंटेशन होने

यकृताच्या ( liver) नुकसानीमुळे त्वचा काळी पडू शकते का?

Black skin

यकृत शरीरातील मुख्य विषारी पदार्थ काढण्याचे काम करत राहते. जेव्हा Liver नीट कार्य करत नाही, तेव्हा शरीरातील टॉक्सिन्स त्वचेतून बाहेर येतात. यामुळे त्वचा फिकट, सडलेली किंवा काळसर दिसू लागते.

Liver च्या कमजोरीमुळे जॉन्डिससारखे लक्षण देखील दिसू शकते, ज्यामध्ये त्वचा पिवळसर किंवा काही ठिकाणी गडद होऊ शकते. शिवाय, तैलकटपणा वाढणे, मुरुमे, डाग किंवा कोरडेपणा देखील त्वचेवर दिसू शकतात.

Categories
Health

Weight loss trick: वजन कमी करण्यासाठी उपाय!

आजच्या धावपळीच्या जीवनात वजन कमी करणे अनेकांसाठी आव्हानात्मक वाटते. अनेक जण पटकन वजन कमी करण्यासाठी उपाय शोधत असतात  पण काळजी करू नका! योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सुसंगत जीवनशैलीने तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता.

वजन कमी करण्यासाठी उपाय
संतुलित आहार
  1. सकाळची कोमट पाणी पिने
  2. संतुलित आहार
  3. दररोज व्यायाम करा
  4. पुरेशी झोप घ्या
  5. पाणी अधिक प्या

अनेक जण पटकन वजन कमी कारण्यासाठी उपाय शोधत असतात किंवा वजन कमी किंवा वाढवण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स किंवा जिममध्ये तासन्‌तास घालवण्याची गरज नसते, नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे म्हणजे शरीराला आणि मनाला संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे.

फिटनेस तज्ज्ञांच्या सांगतात की वजन कमी करण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी सवयी अंगीकारणं करणे आवश्यक आहे. पोटावरील चरबी  कमी करण्यासाठी आहारात छोटे पण सातत्यपूर्ण बदल करा. कारण स्मार्ट पोषण आणि सुसंगतता हाच खरा फॅट लॉस हॅक आहे.

वजन कमी करण्यासाठी काय खावे:  Weight Loss Diet in Marathi

वजन कमी करण्यासाठी आहारात कॅलरी कमी पण पोषक तत्वांनी भरपूर अन्न असणे गरजेचे आहे. जास्त तेलकट, गोड, व तळलेले पदार्थ टाळा आणि नैसर्गिक अन्नपदार्थ निवडा ज्याचा आपणास शरीरावरती फायदा होईल.

ओट्स, मूग डाळ आणि अंकुरित धान्य, फळे, हिरव्या भाज्या, ग्रीन टी किंवा लिंबूपाणी या पदार्थ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात

वजन कमी करण्यासाठी रात्री काय खावे!

रात्री हलके आणि सहज पचणारे अन्न घेणे आवश्यक आहे. रात्री जड, मसालेदार किंवा तळलेले पदार्थ घेऊ नये.रात्री 8 नंतर खाणे टाळा पचन नीट राहते आणि वजन नियंत्रणात ठेवते.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम: Weight Loss Exercise

प्रत्येकाला व्यायाम करणे गरजेचे आहे कारण त्यातून शरीरिक ही स्वस्त राहते तसेच वजनाला नियंत्रणात ठेवते. म्हणून व्यायाम वजन कमी करण्याचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज 30-40 मिनिटे व्यायाम केल्यास परिणाम दिसून येतो.

वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खाऊ नयेत?

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अस्वस्थ आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ टाळणे महत्त्वाचे ठरते. कोणते पदार्थ टाळावेत : जंक फूड, साखरयुक्त पेये, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ हे पदार्थ खाऊ नये.

वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात?

वजन कमी करण्यासाठी भाज्या खाणे महत्त्वपूर्ण ठरते. वजन कमी करण्यासाठी अशा भाज्या खा ज्या कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात. या भाज्या भूक नियंत्रित ठेवतात आणि फॅट बर्न करण्यास मदत करतात.

भाज्या कोणत्या खाव्यात:

वजन कमी करण्यासाठी उपाय
Veg-tables for weight loss

पालक

दुधी भोपळा

गाजर

मटार

ब्रोकली

टोमॅटो


सूर्यनमस्कार केल्याने वजन कमी होते का?

होय ✅

  आरोग्यासाठी सूर्यनमस्कार खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी हा वजन कमी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी योग प्रकार आहे.
दररोज 12 सूर्यनमस्कार केल्याने साधारण 200–250 कॅलरी जळतात त्यातून शरीराला अनेक फायदे होतात जसे की शरीरातील चरबी कमी होते, स्नायू टोन होतात आणि लवचिकता वाढते, हृदयाचे आरोग्य सुधारते, मन शांत राहते आणि झोप चांगली लागते.

रनिंग केल्याने वजन कमी होते का?

रनिंगमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि कॅलरी मोठ्या प्रमाणात बर्न होतात. नियमित रनिंगसोबत संतुलित आहार ठेवला, तर वजन कमी होण्याचा वेग वाढतो.

जेवण कमी केल्याने वजन कमी होते का?

जेव्हा आपण कॅलरी डेफिसिट (Calorie Deficit) मध्ये असतो म्हणजे शरीराला लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा कमी अन्न घेतो तेव्हा शरीर साठवलेल्या चरबीचा वापर करून ऊर्जा तयार करतं. त्यामुळे वजन कमी होतं.

🔸पण अति कमी जेवण (Crash Dieting) केल्याने शरीरातील मेटाबॉलिझम मंदावतो, स्नायू कमी होतात, थकवा येतो आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम मिळत नाही.

🔸योग्य पद्धती म्हणजे — पोषक अन्न, भरपूर पाणी, आणि संतुलित आहार योजना (Protein, Fiber, Good Fats).

रक्तदान केल्याने वजन कमी होते का?

रक्तदान केल्यानंतर सुमारे 450 मिली रक्त कमी होतं, ज्यामुळे काही काळासाठी वजन थोडं कमी दिसतं, पण हे तात्पुरतं असतं. शरीर लवकरच नवीन रक्त तयार करतं आणि वजन पुन्हा पूर्ववत होतं. रक्तदानामुळे आरोग्य चांगलं राहू राहते नवीन रक्तनिर्मिती होते.

Categories
Health

25 High-Protein Foods  Muscle Gain साठी सर्वोत्तम आहार!

High protein Foods खाल्ल्याने आपल्या शरीरातील स्नायू (Muscle), त्वचा, केस, आणि हार्मोन्ससाठी आवश्यक असलेला प्रमुख पोषकतत्त्व (macronutrient) आहे. जर तुम्हाला मसल गेन (Muscle Gain), वजन कमी करणे किंवा ऊर्जा वाढवणे हवे असेल, तर प्रोटीनयुक्त आहार घेणे आवश्यक ठरते..

High-protein Foods खाण्याचे फायदे!

High-Protein Foods 

• मसल गेन होने

• वजन कमी होने

• मेटाबॉलिझम सुधारणा होने

• हाडे व इम्युनिटी मजबूत होने

High-protein foods खाल्याने स्नायूंची वाढ आणि ताकद वाढते तसेच वजन कमी होने प्रोटीनमुळे पोट भरल्यासारखे वाटते. मेटाबॉलिझम मुळे चरबी जाळण्याची क्षमता वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.


High-Protein Foods List

🥩प्राणीजन्य प्रोटीन (Animal Protein Sources)

•अंडी (Eggs)
•कोंबडीचे मांस (Chicken)
•मासे (Fish – सॅल्मन, ट्यूना, रोहू)
•दूध, दही, पनीर (Milk, Yogurt, Cottage Cheese)
•मटण (Lean Meat – प्रमाणात खावे)

🌱वनस्पतीजन्य प्रोटीन (Plant Protein for good for health )

•डाळी (मुग, मसूर, तूर)
•हरभरा व राजमा
•सोयाबीन व टोफू
•मूग स्प्राऊट्स
•बदाम, अक्रोड, काजू
•चिया बिया, फ्लॅक्स सीड्स, भोपळ्याच्या बिया
•क्विनोआ, ओट्स

दररोज किती प्रोटीन घ्यावे:Daily Protein Intake in Marathi

आरोग्यदायी प्रौढ व्यक्तीसाठी प्रोटीनची गरज वजनानुसार मोजली जाते जसेकी

शरीराच्या वजनाच्या प्रति किलो 0.8 – 1 gm protein घेणे आवश्यक ठरते. जर 60 किलो वजन असल्यास 48g – 60g Protein घ्यावे.

एका अंड्यामध्ये किती प्रथिने असतात? 🥚

High-Protein Foods
Egg Protein

मध्यम आकाराच्या एका अंड्यामध्ये साधारण 6 ते 7 gm प्रथिने असतात.

•अंड्याचा पांढरा भाग (Egg White) → 3.5 ग्रॅम प्रथिने

•अंड्याचा पिवळा भाग (Egg Yolk) → 2.5 ते 3 ग्रॅम प्रथिने

•त्यामुळे व्यायाम करणारे लोक जास्त Egg White खाण्यावर भर देतात.

Categories
Health

6 signs of heart attack: एक महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या 6 चिन्हे

हृदयविकार हे अनेक लोकांचा गंभीर विषय झाला आहे. एक महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या 6 चिन्हे जाणून घेऊयात. हृदयविकार (Heart Attack) हा आजार अचानक होत नाही. त्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देत असतो. दुर्दैवाने आपण हे संकेत दुर्लक्षित केल्यामुळे मोठा धोका निर्माण होतो. संशोधनानुसार हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी साधारण एक महिना आधीच शरीर काही लक्षणे दाखवते.

हृदयविकाराचे ६ महत्त्वाचे सुरुवातीचे लक्षणे 👇

एक महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या 6 चिन्हे
Heart attack sign

1. छातीत वेदना किंवा दडपण येणे.

2. श्वास घेण्यास त्रास होने.

3. अनावश्यक थकवा जनवणे.

4. शरीरात घाम येणे.

5. चक्कर येणे किंवा डोके हलके होणे

6. पचनाशी संबंधित समस्या होने.

छातीत वेदना किंवा दडपण (Chest Pain / Pressure)

हृदयविकाराचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत जडपणा, वेदना किंवा दडपण जाणवणे. ही वेदना हात, मान, पाठ किंवा जबड्यापर्यंत पसरू शकते.
👉 जर अशी वेदना वारंवार होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

श्वास घेण्यास त्रास (Shortness of Breath)

जरा चाललं, जिने चढले किंवा हलकीशी हालचाल केली तरी श्वास घेण्यास त्रास होणे हा हृदयविकाराचा सुरुवातीचा इशारा असू शकतो. याकडे बारकाईने लक्ष द्या.

अनावश्यक थकवा जनवणे (Unusual Fatigue)

विशेष काम न करता पण सतत थकवा जाणवणे, उठल्याबरोबरच शरीरात ऊर्जा नसणे, हे हृदयाशी संबंधित समस्या दर्शवू शकते. महिलांमध्ये हे लक्षण अधिक आढळते.

शरीरात घाम येणे (Sweating)

थंड हवामान असतानाही जास्त घाम येणे किंवा अचानक घाम फुटणे, हा हृदयविकाराचा इशारा असतो. विशेषतः रात्री झोपेतून उठल्यावरही घाम येत असेल तर लक्ष द्यावे.

चक्कर येणे किंवा डोके हलके होणे (Dizziness)

अचानक चक्कर येणे, डोकं हलके होणे किंवा बेशुद्ध पडण्यासारखी अवस्था निर्माण होणे हे हृदयाच्या रक्तपुरवठ्यातील अडथळ्याचे लक्षण असू शकते. मग याकडे लक्ष देऊन आपली काळजी करणं महत्त्वाचे आहे.

पचनाशी संबंधित समस्या!

पोटात जडपणा, अपचन, मळमळणे, ओकारी येणे यांसारखी लक्षणेही हृदयविकारापूर्वी दिसतात. लोक याला सहसा गॅस्ट्रिक प्रॉब्लेम समजतात, पण हे हृदयविकाराचे संकेत असू शकतात.


हार्ट अटॅक आल्यावर काय करावे: Heart attack alyavar kay karave in marathi

हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होणे, अटॅक आल्यानंतर माणसाला भीती वाटायला सुरू होते. त्यामुळे हार्ट अटॅकच्या वेळी तात्काळ योग्य उपाय करणे महत्त्वाचे आहे. शांत राहा आणि लगेच मदत मागवा, रुग्णाला आरामदायी स्थितीत बसा, जवळ असल्यास Aspirin (300 mg चघळून घ्या), वाहनाने स्वतः रुग्णालयात जाणे टाळा.


हृदयविकार टाळण्यासाठी काय करावे?

नियमित व्यायाम करा
• तणाव कमी ठेवा
• तळलेले, तेलकट व जंक फूड टाळा
• धूम्रपान व मद्यपानापासून दूर रहा
• नियमित तपासणी करून घ्या


स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे!!

स्त्रियांमध्येही मोठ्या प्रमाणावर आढळणारी गंभीर समस्या झाली आहे. अनेक वेळा स्त्रियांना हृदयविकाराची लक्षणे वेगळी असतात जसे की जबडा व खांद्यामध्ये वेदना, छातीत वेदना किंवा जळजळ, श्वास घेण्यास त्रास, उलटी होणे किंवा पोटात दुखणे जवळपास असे लक्षणे दर्शवतात.


हृदयविकाराचा झटका नेहमीच गंभीर असतो का?

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा अनेक वेळा गंभीर असतो, कारण तो थेट हृदयाच्या स्नायूंवर परिणाम करतो. मात्र, प्रत्येक झटका एकसारखा नसतो. काही प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात आणि व्यक्ती वेळेवर उपचार घेतल्यास धोका टाळता येतो. पण उपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. हृदयविकाराचा झटका गंभीर असला की रक्तपुरवठा थांबतो, हृदयाचे स्नायू नुकसान होतात.


हृदयविकाराचा झटका आल्यास काय करू नये?

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यास काही चुकीची पावले उचलल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते. Heart attack आल्यास विलंब करू नका, स्वतः वाहन चालवू नका, जास्त शारीरिक हालचाल करू नका, घाबरू नका व इतरांना घाबरवू नका हृदय विकार आल्यानंतर या गोष्टी करू नये.


कोणते फळ हृदय शुद्ध करते: Which fruit cleanses the heart

एक महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या 6 चिन्हे
Best fruits for heart

•डाळिंब (Pomegranate)

•सफरचंद(Apple)

•संत्रे व लिंबूवर्गीय फळे(Citrus Fruits)

•द्राक्षे (Grapes)

•पपई (Papaya)

हे हृदयासाठी फायदेशीर ठरते!

हृदय हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयव आहे. योग्य आहार घेतल्याने हृदय निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. काही फळांमध्ये असे नैसर्गिक घटक (antioxidants, fiber, vitamins, minerals) असतात जे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून हृदय शुद्ध करतात व धमन्या स्वच्छ ठेवतात.


कोलेस्ट्रॉलसाठी कोणते गरम पेय हानिकारक आहेत?

कोलेस्ट्रॉल वाढवणारी हानिकारक❌ गरम पेये

• जास्त साखर घातलेला चहा( Milk Tea with Sugar)

• क्रीमसह कॉफी (Coffee with Cream & Sugar)

• हॉट चॉकलेट (Hot Chocolate)

• पॅकेज्ड गरम ड्रिंक्स (Packaged Hot Drinks)

• पॅकेज्ड गरम ड्रिंक्स (Packaged Hot Drinks)

कोलेस्ट्रॉलसाठी चांगले गरम पेय (पर्याय)

✅ ग्रीन टी

✅ हर्बल टी

✅ ब्लॅक कॉफी

✅ हळदीचे दूध

या गोष्टीचा कोलेस्ट्रॉल साठी फायदेशीर ठरतात!


हृदयरोग असल्यास कोणते फायदे मिळवू शकतो?

हृदयरोग आल्यावर लोक आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागतात. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, आणि ब्लड शुगर तपासणे यावर लक्ष दिले जाते म्हणून आरोग्याबाबत सजगता वाढते जसेकी जीवनशैलीत सुधारणा होते, शरीराचे गुणवत्ता,  औषधोपचार व उपचारांची माहिती मिळते, जीवनाची गुणवत्ता सुधारते, कुटुंब आणि सामाजिक आधार मिळतो, धोके ओळखण्याची क्षमता यातून मनुष्य सतर्कता बाळगतो.


हृदयासाठी कोणता आहार सर्वोत्तम आहे?

Protein food

(Good health )हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार खूप महत्वाचा आहे. योग्य आहारामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो, रक्तदाब संतुलित राहतो आणि हृदयविकाराच्या जोखमी कमी होतात. त्यामुळे हृदयासाठी सर्वोत्तम आहार महत्वपूर्ण ठरते जसे की फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, हृदयासाठी निरोगी फॅट्स, प्रोटीनयुक्त पदार्थ जसेकी: डाळी, हरभरा, मूग, सोयाबीन, कमी फॅटयुक्त कोंबडी/मासे.


Categories
Health

Leg Pain :पाय दुखणे: कारणे, लक्षणे आणि सोपे घरगुती उपाय 

Leg pain : पाय दुखणे ही सर्व सामान्यांची अडचण झाली आहे. एक काळा होता त्या काळामध्ये वृद्ध  माणसाचे पाय दुखायचे हल्ली सामान्य माणसांमध्ये पाय दुखी लक्षण आढळून यायला लागलेत. पाय दुखणे मध्ये कधी हलक्या वेदना तर कधी तीव्र दुखणे असे लक्षण दिसते. पायदुखीमुळे चालणे, उभे राहणे किंवा दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो.

Leg Pain ( पाय दुखणे )
Leg pain

गुडघ्याला सूज का येते!

गुडघ्याला सूज येणे याला वैद्यकीय भाषेत (Knee Swelling) किंवा (Water on the Knee) असे म्हटले जाते. गुडघ्यातील सांध्यामध्ये द्रव जमा झाल्यामुळे, जखम, इजा किंवा काही आजारांमुळे गुडघा सुजतो. पायांमध्ये आलेली सूज (Leg Swelling) ही शरीरात द्रव साठणे, इजा होणे, हाड मोडणे, स्नायू दुखापत, रक्तदाबातील बदल किंवा हृदय-यकृत-मूत्रपिंडाशी संबंधित आजार यामुळे होऊ शकते.

गुडघेदुखीसाठी कोणता आहार सर्वोत्तम आहे!

कॅल्शियम, व्हिटॅमिन D, अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन, या पद्धतीने तुमी आहार घेऊ शकतात, विशेष:साखर व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा ❌

पाय दुखणे कशे थांबवायचे!

पाय दुखण्याचे थांबवायचे असतील क्रिया करा – पाय दुखत असल्यास पाय उंच ठेवून विश्रांती द्या, झोपताना पाय उंच ठेवणे फायदेशीर ठरते. हे सूज कमी करण्यास मदत करते आणि रक्ताभिसरण सुधारते. ताण किंवा स्नायू दुखत असल्यास गरम पॅक लावा : सूज असल्यास थंड पॅक लावा. दिवसातून 2–3 वेळा 15–20 मिनिटे याचा वापर करावा.

गुडघे दुख असल्यास काय करू नये?

Leg pain ( पाय दुखी )

गुडघे दुखत असल्यास काही गोष्टी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण चुकीचे वागणे दुखणे वाढवू शकते किंवा जखम गंभीर करू शकते.

• अत्याधिक वजन आणि दबाव टाळा

• गुडघ्याला जोराचा किंवा अचानक दबाव देणे टाळा

• गुडघ्यावर जास्त थंडी/उष्णता लावणे टाळा

• लांब काळ चालणे किंवा अनवधानाने हालचाल करणे टाळा

गुडघेदुखीसाठी बसण्याची सर्वोत्तम स्थिती कोणती आहे!

गुडघेदुखीसाठी बसण्याची योग्य आणि आरामदायी स्थिती खूप महत्त्वाची आहे. चुकीच्या स्थितीत बसल्यास दुखणे वाढू शकते आणि गुडघ्यांवर अधिक ताण येऊ शकतो. गुडघेदुखीसाठी बसण्याची सर्वोत्तम स्थिती : सोप्या खुर्चीत सरळ बसणे, पाय उंच ठेवणे, लांब काळासाठी बसणे टाळा, पॅड किंवा उशी वापरणे, पाय क्रॉस न करता सरळ ठेवणे चांगले.

पाय ओलांडल्याने गुडघे का दुखतात!

Leg pain ( पाय दुखी )
Knee pain

पाय ओलांडल्यास गुडघ्यांवरचा दाब असमान पसरतो. यामुळे गुडघ्याच्या सांध्यावर ताण येतो आणि दुखणे सुरू होऊ शकते. जर गुडघ्यात आधीपासूनच जखम, अर्थराइटिस किंवा सूज असेल, तर पाय ओलांडल्याने वेदना वाढतात.

गुडघेदुखीवर रामबाण उपाय!

काही नैसर्गिक आणि सोप्या उपायांनी तुम्ही हे दुखणे कमी करू शकता.

गरम पाणी किंवा हिट पॅक

साधा व्यायाम

हळदीचे दूध

संतुलित आहार

हर्बल किंवा नैसर्गिक तेल

योगा आणि स्ट्रेचिंग 🙁 वृक्षासन, भुजंगासन, शिशुपासन यासारखे योगासन गुडघ्याला बळकटी देतात)

पाय दुखण्याच्या पद्धती!!!

• गुडघ्याच्या खाली दुखणे
• गुडघ्याची गादी फाटणे
• गुडघ्याच्या मागे दुखणे
• गुडघ्याच्या खाली पाय दुखणे
• एकच पाय दुखणे
• रात्री पाय दुखणे


गुडघ्याच्या खाली दुखणे
कारणे: पॅटेला किंवा हाडाच्या खालील स्नायू आणि टेंडनमध्ये ताण, घामट किंवा संधिवात होने.

उपाय = हलके स्ट्रेचिंग आणि घामट मसाज करा


गुडघ्याची गादी फाटणे
कारणे: स्नायू किंवा लिगामेंटची ताण, ओसाडेपणा, जाड वजन

उपाय: हलके व्यायाम आणि योगा करा


गुडघ्याच्या मागे दुखणे
कारणे: हॅमस्ट्रिंग स्नायू ताणणे, लिगामेंट इजा, बर्सायटिस होने

उपाय: स्थानिक जेली किंवा क्रीम लावून मसाज करा


गुडघ्याच्या खाली पाय दुखणे
कारणे: पॅटेला ट्रॅकिंग समस्या, सायटिका किंवा ताणलेले स्नायू दुखणे

उपाय: गुडघ्याला सपोर्ट करणे
हलके चालणे किंवा फिजिओथेरपी घेणे…


एकच पाय दुखणे
कारणे: एकसंध संधिवात, इजा, हाडाची कमी घर्षण होने

उपाय: डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.


रात्री पाय दुखणे
कारणे: ऑस्टियोआर्थ्रायटिस, लवकर स्नायूंचे कडकपणा, रक्तसंचार कमी होणे

उपाय: रात्री हलके स्ट्रेचिंग
गरम पॅक किंवा हलके मसाज करून घेणे

Categories
Health

5-tips for zakas health: आरोग्यदायी जीवनासाठी 5 टिप्स

आयुष्य जगत असताना आरोग्याची काळजी घेणे हे सर्वप्रथम प्रत्येकांचे जबाबदारी असते, आरोग्य असेल तर सर्व गोष्टी सुखरूप असतात. आरोग्य: म्हणजे शरीर, मन आणि समाज यांचा समतोल साधणे. निरोगी राहण्यासाठी केवळ आजार नसणे पुरेसे नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे असते. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे कमी झाले आहे. आपल्या जीवनशैलीत, आहारात आणि दैनंदिन सवयींमध्ये केलेले छोटे-छोटे बदल जे दीर्घकाळासाठी शरीर आणि मन निरोगी ठेवतात. या गोष्टीकडे लक्ष ठेवत सरकारनेही जनते साठी अनेक योजना काढले आहेत जसेकी – महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री आयुष्मान आरोग्य योजना. आरोग्य म्हणजे शरीर, मन आणि सामाजिक जीवन यांचा समतोल व निरोगी अवस्था. काय सवयी जे ठेवतील तुम्हाला आयुष्यभर निरोगी. 

1. संतुलित आहार.
2. नियमित व्यायाम/योगा.
3. पुरेशी झोप.
4. पाणी भरपूर पिने.
5. ताण कमी ठेवा.

1. संतुलित आहार:

आरोग्य
संतुलित आहार

संतुलित आहारामध्ये 5 अन्न गटातील विविध पदार्थ योग्य प्रमाणात खाणे समाविष्ट असते. यात कर्बोदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरसह संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो.

आरोग्य
समतोल आहार


योग्य प्रमाण आणि आहारातील समतोल राखणे, तसेच पर्याप्त मात्रेत भाज्या आणि फळांचे सेवन करणे हे संतुलित आहाराचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. दररोज विविध फळे आणि भाज्यांचे आहार घ्यावा.

संतुलित आहाराचे प्रमाण

अर्धा भाग फळे आणि भाज्या

एक चतुर्थांश प्रथिने

एक चतुर्थांश धान्य

यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्ती आणि पोषण मिळते.

नियमित व्यायाम / योगा कारणे!!!

आरोग्य
व्यायाम करणे

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगा केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि मन निरोगी राहते. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, वजन नियंत्रित राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर योगामुळे मानसिक ताण कमी होतो, लवचिकता वाढते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

पुरेशी झोप घेणे :

झोपे झाल्यामुळे शरीराला आवश्यक विश्रांती मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते व आजारांपासून बचाव होतो. हृदयाचे आरोग्य चांगले राहते झोपेमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो व हृदयविकाराचा धोका कमी होतो. झोपेमुळे त्वचेचा तेज टिकून राहतो, डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.

ताण कमी करणे!

Strees free

आजच्या धावपळीच्या जीवनामुळे मध्येय ताण हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे. आयुष्यामध्ये ताण असेल तर अनेक गोष्टीला आपण अडचनीत येतो जसे की मानसिक, शारीरिक अडचणी मध्ये वाढ होणे. ताण कमी करायचा असेल तर ध्यान साधना, नियमित योग्य व्यायाम, आवडणाऱ्या गोष्टी करणे यातून आपण ताण मुक्त होऊ शकतो. ताण मुक्त झाल्यानंतर आपणाला बरेचसे फायदे भेटतात जसेकी कौशल्यविकास, आत्मविश्वास वाढतो, ताण हाताळण्याचा सराव झाल्याने भविष्यातील कठीण प्रसंग अधिक सहज हाताळता येते.


आरोग्य टिकवण्याचे मूळ उपाय:

चांगले आरोग्य म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा योग्य समतोल राखणे. केवळ आजार नसणे एवढेच आरोग्य नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्त राहणे हेच खरे चांगले आरोग्य आहे….

भारतीययांच्या मुख्य आरोग्य समस्या!

हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, लठ्ठपणा, श्वसनाचे आजार, मानसिक आरोग्य समस्या असे अनेक मुख्य आरोग्य समस्या भारतीय यांच्या आहेत. यातला कुठलाही रोग आपल्याला जडला की आपण ताण, नैराश्य, चिंता आणि झोपेच्या समस्या या मोठ्या मानसिक आरोग्य समस्या आहेत व्हायला सुरुवात होते. आरोग्य समस्या कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, प्रदूषण नियंत्रण, ताण कमी करणे आणि जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे.

आरोग्य आणि निरोगीपणाच्या परिमाणांनुसार निरोगी जीवनशैली कशी राखता येईल?

निरोगी जीवनशैली ही केवळ शारीरिक आरोग्यावर आधारित नसून ती शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय या सर्व परिमाणांवर अवलंबून राहते. प्रत्येक परिमाणात संतुलन साधल्यास दीर्घकाळ चांगले आरोग्य ठेवता येते..

आरोग्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आहेत?

आरोग्य
चांगल्या सवयी

निरोगी जीवन जगण्यासाठी काही चांगल्या सवयी अंगीकारणे खूप महत्त्वाचे आहे. कारण त्या सवयी शरीरासोबतच मनाचेही आरोग्य वेवस्तीत ठेवते, धूम्रपान, मद्यपान आणि जंक फूडपासून दूर राहणे. दिवसभरात 7–8 ग्लास पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. हळूहळू जेवण कारणे, निरोगी पदार्थ खाणे, टाईमवरती झोप, सकाळी व्यायाम कारणे आणि रोजच्या व्यायामामुळे शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात. संतुलित जेवण खाणे हे आरोग्य साठी सवयी चांगले.

संपूर्ण धान्य (Whole Grains) खाणे हा आरोग्यासाठी उत्तम राहते!

Whole grains

आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते आणि संपूर्ण धान्य निवडणे हा नेहमीच सर्वोत्तम पर्याय असतो अर्थात “आपल्या शरीरासाठी कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात आणि त्यासाठी संपूर्ण धान्य (Whole Grains) खाणे हा आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे.”

Zakastimes.com

 

Categories
Health

dalchini benefits – महिला, पुरुषांसाठी दालचिनीचे अनेक फायदे???

दालचिनी वैशिष्ट्ये –  Dalchini हे एक मसाला पदार्थ आहे, जेवणाची चव वाढवण्यासाठी प्रत्येक स्वयंपाकघरात dalchini वापर केला जातो. दालचिनी भाजीपदार्थांमध्ये चवीसाठी उत्कृष्ट काम करते. तसेच त्याचा वापर केल्यानंतर जेवणाला ही चव वाढते. दररोज dalchini खाल्ल्याने अनेक फायदे आपल्याला होतात. दालचिनी चहामुळे स्वीट्स तसेच जंक फूडची लालसा कमी करण्यास मदत मिळते. दालचिनीचे कडक गंध आणि चव यामुळे ती गोड आणि आंबट दोन्ही प्रकारच्या पदार्थांसाठी अचूक पदार्थ ठरते.

dalchini reduce cholesterol level – दालचिनी कोलेस्ट्रॉल कमी करते…

Dalchini: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी dalchini उपयुक्त ठरते. संशोधनानुसार, दालचिनी नियमित प्रमाणात घेतल्यास शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढण्यास मदत होते.

दालचिनी (Dalchini) एक्सपायर होते का? Does dalchini expire

❓पण एक प्रश्न अनेकदा पडतो – “दालचिनी एक्सपायर होते का?”

Dalchini लगेच खराब होत नाही, पण तिचा सुगंध व औषधी गुणधर्म टिकवण्यासाठी १–२ वर्षांच्या आत वापरणे योग्य ठरते.


dalchini
दालचिनी चे फायदे ( dalchini benefits )

स्त्रियांसाठी होणारे dalchini चे फायदे

✳️हॉर्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत होते.

✳️मासिक पाळीदम्यान तुम्हाला दालचिनीचा Cinnamon tea चहा पिणं फायदेशीर ठरू शकतं. 

✳️dalchini मुळे पाळीच्या वेदना (Menstrual cramps) कमी होतात.

✳️पाळी नियमित होण्यास मदत करते.

✳️dalchini वापराणी तोंडाची मुखशुद्धी करते आणि मधासोबत दालचिनी खाल्ल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.


दालचिनीचे होणारे समांतर फायदे =

✳️dalchini चा वापराणी पचन सुधारते, सर्दी कमी होते, स्मरणशक्ती वाढते आणि स्वयंपाकात

✳️ शरीरातील मेटाबॉलिझम वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.

✳️पोटाची चरबी कमी करण्यात उपयोगी ठरते.

✳️dalchini मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे आपल्या रोगप्रतिकारकशक्तीला वाढवण्यास मदत करतात.

✳️ dalchini मुळे सुधारित पचन, चांगले रक्त शर्करा नियंत्रण आणि वर्धित हृदयाचे आरोग्य समाविष्ट होते.


दालचिनी रोज किती प्रमाणात घेतली पाहिजे!!!

dalchini आपण रोज 5gm ते 10gm परेंत घेऊ शकतोत…..


Dalchini चा वापर कुठे कुठे होतो?

Dalchini ही एक प्रसिद्ध मसाला व औषधी वनस्पती (Spice & Medicinal Herb) आहे जी स्वयंपाक, औषधोपचार आणि सौंदर्य उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

स्वयंपाकात (In cooking dalchini Uses)
• Vlog आणि कॉफी मध्ये सुगंधासाठी
• बिर्याणी, पुलाव, भाज्या यांना चविष्ट करण्यासाठी
• केक, कुकीज, मिठाई मध्ये फ्लेवरसाठी
•गरम मसाला मध्ये मुख्य घटक

आरोग्यासाठी (Health Benefits)

dalchini


• ब्लड शुगर नियंत्रित करण्यात मदत
• वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
• पचन सुधारते व गॅस कमी करते
• सर्दी-खोकला यावर घरगुती उपाय
• हृदयासाठी फायदेशीर

सौंदर्य व घरगुती उपाय (Beauty & Home Remedies)

dalchini


• dalchini powder स्किन ग्लो साठी फेसपॅकमध्ये वापर
• केस गळती कमी करण्यासाठी तेलात मिसळून वापर
• तोंडाचा वास कमी करण्यासाठी dalchini किंवा dalchini powder वापर


दालचिनी कसे वापरावे ( How to use cinnamon)

▪️गरम पाण्यात dalchini पावडर घालून पिणे.
▪️दूधात किंवा चहात dalchini टाकून घेणे.
▪️मधासोबत थोडी दालचिनी पावडर घेणे.

अशा पद्धतीने आपण दालचिनी ( dalchini) चा वापर करू शकतो…


Categories
Health

What to eat gain weight – वजन वाढवणाय साठी काय खावे???

शरीराचं वजन खूप कमी असणं हे आरोग्यासाठी तितकंच घातक असू शकते वजन कमी असणे म्हणजे आपण अनेक आजाराला आमंत्रण देतोत.

🌟परिणाम….
✳️ वजन कमी असले की रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, असे झाले सर्दी, ताप वारंवार येतो


✳️ स्नायू आणि हाडं कमजोर होतात, लवकर थकवा येतो, हाडं ठिसूळ होतात


✳️ शरीर विकास थांबतो, मुलं व तरुणांमध्ये उंची नीट वाढत नाही, शरीर कृश दिसतं.


✳️ रक्ताची कमतरता झाली की थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवतो.


✳️ मानसिक परिणाम,झाला की आत्मविश्वास कमी होतो, सतत चिंताग्रस्त किंवा डिप्रेशनसारखी लक्षणं

अशे अनेक आजार वजन कमी झाले की आपणाला होतात मग वजन वाडीसाठी काय करावे…


🟢 प्रोटीनयुक्त पदार्थ मध्य हे घेऊ शकता-अंडी, कोंबडी, मासे
डाळी, हरभरा, सोयाबीन, मूग, राजमा
शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड


🟢 फळे –
केळी, आंबा, सफरचंद, चिक्कू, द्राक्षे
खजूर, मनुका, अंजीर, सुकी फळे


🟢धान्य व कार्बोहायड्रेट्स –
भात, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी
रवा, पोहे, पास्ता, ब्रेड


🟢दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही, चीज, पनीर
शेक्स (दूध + केळी, आंबा, खजूर, सुका मेवा)

अशा प्रकारे आपण वजन वाढ करू शकतात….

Categories
Health

Dry fruits benifits in Marathi:

Dry fruits वैशिष्ट्ये =

Dry fruits खाल्ल्याने ताकत आणि मेंदूची शक्ती वाढते असे मानले जाते. सुका मेवामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात तसेच स्मरणशक्तीची असो वा पचनशक्तीची, पोटातील गॅससंबंधित असो किंवा बद्धकोष्ठासंबंधित ड्राय फ्रुट्स उपाय म्हणून कार्य करत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ आहारात सुक्या मेव्यांचा समावेश करण्यावर विशेष भर देतात. Dry fruits खाल्ल्याने शरिरातील वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन होते…

Dry fruits : बदाम, काजू, अक्रोड, मनुका, अंजीर, खजूर व पिस्ता यांसारखे सुके मेवे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. नियमित प्रमाणात ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने भरपूर फायदे होतात. दवाखाना ला लाखों रुपये खर्च झाल्यानंतर आपण ड्राय फ्रुटस खायला लागतो. दवाखान्या येण्याच्या अगोदर आपण ड्रायफ्रूट खाण्यास चालू केलं तर अनेक फायदे आपल्या शरीरावरती होतात. ड्रायफ्रूट ( Dry fruits )  मध्ये अनेक गुणधर्म आहेत जसं की अँटिऑक्सिडंट, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी घटक असतात यातून आपणाला अनेक फायदे होतात, शरीरात ऊर्जा वाढवणे, हाडांची ताकद वाढवणे, रक्ताची वाढ व रक्ताची शुद्धीकरण करणे, शरीरात ताकदीचे प्रमाण वाढ करणे इत्यादी अनेक फायदे आपल्याला भेटतात…

मधुमेहासाठी सुक्या मेव्याचे फायदे (Diabetes Dry Fruits Benefits in Marathi)

मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांसाठी सुकामेवा हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास तो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. सुक्या मेव्यामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने मधुमेहासाठी तो लाभदायक ठरतो.

गर्भावस्थेत सुका मेवा खाण्याचे फायदे | Dry Fruits Benefits in Pregnancy in Marathi

गर्भावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ असतो. या काळात योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर व तज्ज्ञांच्या मते, सुका मेवा (Dry Fruits) हा गर्भवती महिलांसाठी पोषणाचा उत्कृष्ट स्रोत आहे. बदाम, काजू, अक्रोड, खजूर, अंजीर, मनुका इत्यादी सुका मेवा खाल्ल्याने आई व बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते.


प्रमुख Dry – fruits आणि त्यांचे फायदे:

Dry fruits

खजूर ( खारीक) :
ऊर्जा वाढवतात आणि शरीराला आवश्यक ऊर्जा देतात, तसेच पचन सुधारतात.

अंजीर :
फायबरचा चांगला स्रोत, जे पचनासाठी आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे

बदाम :
अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण, जे वृद्धत्व टाळण्यास मदत करते.

अक्रोड :
मेंदूच्या आरोग्यासाठी आणि संज्ञानात्मक कार्यासाठी फायदेशीर आहे.

पिस्ता:
लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांचा चांगला स्रोत आहे.

मनुका :
नैसर्गिक साखरेमुळे शरीराला त्वरित उर्जा मिळते. मनुका मुळे कोलेस्टेरॉल कमी ठेवण्यास मदत करते….


ड्रायफ्रूट खाण्याची पद्धत….


ड्रायफ्रूट खाण्याचे योग्य पद्धत म्हणजे रात्री सर्व ड्रायफ्रूट्स दुधात भिजवून खाण्याचे फायदे अनेक पटीने  फायदेशीर ठरते. अनशापोटी / रिकाम्या पोटी खाल्ल्याने भरपूर ऊर्जा व दिवसभरासाठी ताकद मिळते  dry fruits भिजून खाल्ल्याने त्यामध्ये पोषक तत्व जास्त वाढतात

   zakastimes.Com