Categories
फूड

Benefits of eating local meat: स्थानिक मांस खाण्याचे फायदे

आजच्या आरोग्य-जागृत काळात आपल्याला फक्त चवदार अन्न नव्हे, तर ताजे आणि पर्यावरणपूरक अन्न खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये खाण्याचे शैली बदलत चालली आहे. स्थानिक पातळीवर तयार झालेले मांस खाणे ही संकल्पना लोकप्रिय होत आहे. या कल्पनेचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक शेतकऱ्यांना आधार देणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि ताजे, पौष्टिक अन्न खाणे याचा मोठा फायदा प्रत्येक खाणाऱ्यांना होतो.

Eating local meat खाल्याने  ताजेपणा टिकतो, रासायनिक प्रक्रिया कमी होते आणि कार्बन उत्सर्जनही कमी होते, म्हणून लोकल मांस खाणे आवश्यक ठरते

Eating local meat का करावे?

Eating local meat

Local Meat” घेतल्याने लांब वाहतूक कमी होते, त्यामुळे कार्बन फूटप्रिंट (Carbon Footprint) कमी होते आणि पर्यावरणावर होणारा ताण घटतो. स्थानिक मांसावर अतिरेकी अ‍ॅडिटिव्हज, हार्मोन्स किंवा प्रिझर्वेटिव्ह्ज वापरलेले नसतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी अधिक सुरक्षित असते. स्थानिक शेतकरी आणि उत्पादकांकडून मांस घेतल्यास, तुम्ही स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देता. यामुळे ग्रामीण भागातील रोजगार आणि शाश्वत शेतीला फायदा होतो.

स्थानिक मांस खाण्याचे फायदे!!

आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

पर्यावरणस्नेही पर्याय होतो

स्थानिक शेतकऱ्यांना आधार मिळतो

ताजेपणा आणि चव खायला मिळते

सतत टिकणारा आहार राहतो


स्थानिक मांस ताजे असल्यामुळे त्यातील प्रथिने, जीवनसत्वे आणि नैसर्गिक चव टिकून राहते.
यात कोणतेही रासायनिक प्रिझर्व्हेटिव्ह किंवा कृत्रिम फ्लेवर नसतात. त्यामुळे हे मांस सुरक्षित आणि पौष्टिक असते. लांब अंतरावरून मांस वाहतुकीसाठी इंधन जळते आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन वाढते.
पण स्थानिक मांस खाल्ल्यास कार्बन फूटप्रिंट कमी होते आणि पृथ्वीचे रक्षण होते. स्थानिक शेतकरी आणि पोल्ट्री उत्पादकांकडून मांस विकत घेतल्याने त्यांना थेट नफा मिळतो. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते आणि “Buy Local, Eat Local” चळवळ बळकट होते. कमी अंतर प्रवास केल्याने मांसाचा नैसर्गिक ताजेपणा टिकतो. फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवलेले किंवा फ्रोझन मांसाच्या तुलनेत स्थानिक मांसाची चव अधिक समृद्ध असते.

मांस खाणे त्वचेसाठी चांगले आहे का?

होय, मांस खाणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते, पण योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचे मांस निवडणे महत्त्वाचे आहे. मांसामध्ये प्रथिने (Protein), झिंक (Zinc), आणि व्हिटॅमिन B12 मुबलक प्रमाणात असते. हे घटक त्वचेच्या पेशींचे पुनर्निर्माण करतात, कोलाजेन तयार करण्यात मदत करतात आणि त्वचा तजेलदार ठेवतात. मात्र अति प्रमाणात रेड मीट (Red Meat) खाल्ल्यास त्वचेवर मुरुमे, तेलकटपणा आणि सूज येऊ शकते. म्हणून आठवड्यातून 2-3 वेळा संतुलित प्रमाणात मांस खाणे उत्तम राहते.

भारतात कोणते मांस सर्वाधिक खाल्ले जाते?

eating local meat
मांसहरी

भारतामध्ये मोठा वर्ग मास खाणार आहे. आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त खाणारे मास म्हणजे : चिकन, मासे, अंडी, मटण आहे. हे सहज कुठल्याही भारताच्या कानाकोपऱ्याच्या हॉटेलमध्ये उपलब्ध असते.

आरोग्यासाठी सर्वोत्तम मांस कोणते आहे?

मासे हे सुपरफूड मानले जातात कारण त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले ओमेगा-3, व्हिटॅमिन D, आणि उच्च दर्जाचे प्रथिने (Protein) असतात.
हे घटक आपल्या हृदय, मेंदू, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी ठरते.

मांस खाणे बंद केल्यावर काय होते?

मांस खाणे बंद केल्यावर शरीरात आणि पर्यावरणात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. आजकाल अनेक लोक आरोग्य, प्राणीसंवर्धन आणि पर्यावरण यासाठी शाकाहार (Vegetarian lifestyle) स्वीकारत आहेत. मास बंद केल्याचे अनेक फायदे होतात जसे की हृदयाचे आरोग्य सुधारते, त्वचा आणि पचन सुधारते, ऊर्जेत वाढ होते, वजन नियंत्रणात राहते अशे अनेक मास बंद केल्याचे फायदे आपण होतात. 

कोणते जीवन चांगले – शाकाहारी की मांसाहारी?

Eating local meat
शाकाहारी

शाकाहारी जीवनशैली आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अधिक अनुकूल मानली जाते.

मांसाहारी आहारमध्ये प्रथिने (Protein), लोह (Iron), आणि व्हिटॅमिन B12 मिळते, पण जास्त प्रमाणात खाल्यास कोलेस्टेरॉल वाढू शकतो.

भाज्या, फळे आणि आवश्यक प्रमाणात घेणे हेच सर्वोत्तम आहार आहे

जगभरात सर्वात जास्त कोणते मांस खाल्ले जाते?

चिकन (कोंबडीचे मांस) हे जगभरात सर्वात जास्त खाल्ले जाणारे मांस आहे. त्यानंतर डुकराचे मांस (Pork) आणि गोमांस (Beef) यांचा क्रम लागतो जगभरातील लोकांची मागणी अनेक मांस पद्धतीमध्ये आहे….

By Narsing Pawar

नमस्कार 🙏 मी Narsing pawar ZakasTimes ब्लॉग चा संस्थापक, लेखक आणि डिजिटल क्रिएटर आहे. मी एक Marathi Blogger, YouTuber आणि Entrepreneur असून वाचकांपर्यंत दर्जेदार, विश्वासार्ह आणि माहितीपूर्ण कंटेंट पोहोचवण्यावर आपला भर असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *