Categories
फूड

Benefits of eating local meat: स्थानिक मांस खाण्याचे फायदे

आजच्या आरोग्य-जागृत काळात आपल्याला फक्त चवदार अन्न नव्हे, तर ताजे आणि पर्यावरणपूरक अन्न खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये खाण्याचे शैली बदलत चालली आहे. स्थानिक पातळीवर तयार झालेले मांस खाणे ही संकल्पना लोकप्रिय होत आहे. या कल्पनेचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक शेतकऱ्यांना आधार देणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि ताजे, पौष्टिक अन्न खाणे याचा मोठा फायदा प्रत्येक खाणाऱ्यांना होतो.

Eating local meat खाल्याने  ताजेपणा टिकतो, रासायनिक प्रक्रिया कमी होते आणि कार्बन उत्सर्जनही कमी होते, म्हणून लोकल मांस खाणे आवश्यक ठरते

Eating local meat का करावे?

Eating local meat

Local Meat” घेतल्याने लांब वाहतूक कमी होते, त्यामुळे कार्बन फूटप्रिंट (Carbon Footprint) कमी होते आणि पर्यावरणावर होणारा ताण घटतो. स्थानिक मांसावर अतिरेकी अ‍ॅडिटिव्हज, हार्मोन्स किंवा प्रिझर्वेटिव्ह्ज वापरलेले नसतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी अधिक सुरक्षित असते. स्थानिक शेतकरी आणि उत्पादकांकडून मांस घेतल्यास, तुम्ही स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देता. यामुळे ग्रामीण भागातील रोजगार आणि शाश्वत शेतीला फायदा होतो.

स्थानिक मांस खाण्याचे फायदे!!

आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

पर्यावरणस्नेही पर्याय होतो

स्थानिक शेतकऱ्यांना आधार मिळतो

ताजेपणा आणि चव खायला मिळते

सतत टिकणारा आहार राहतो


स्थानिक मांस ताजे असल्यामुळे त्यातील प्रथिने, जीवनसत्वे आणि नैसर्गिक चव टिकून राहते.
यात कोणतेही रासायनिक प्रिझर्व्हेटिव्ह किंवा कृत्रिम फ्लेवर नसतात. त्यामुळे हे मांस सुरक्षित आणि पौष्टिक असते. लांब अंतरावरून मांस वाहतुकीसाठी इंधन जळते आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन वाढते.
पण स्थानिक मांस खाल्ल्यास कार्बन फूटप्रिंट कमी होते आणि पृथ्वीचे रक्षण होते. स्थानिक शेतकरी आणि पोल्ट्री उत्पादकांकडून मांस विकत घेतल्याने त्यांना थेट नफा मिळतो. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते आणि “Buy Local, Eat Local” चळवळ बळकट होते. कमी अंतर प्रवास केल्याने मांसाचा नैसर्गिक ताजेपणा टिकतो. फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवलेले किंवा फ्रोझन मांसाच्या तुलनेत स्थानिक मांसाची चव अधिक समृद्ध असते.

मांस खाणे त्वचेसाठी चांगले आहे का?

होय, मांस खाणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते, पण योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचे मांस निवडणे महत्त्वाचे आहे. मांसामध्ये प्रथिने (Protein), झिंक (Zinc), आणि व्हिटॅमिन B12 मुबलक प्रमाणात असते. हे घटक त्वचेच्या पेशींचे पुनर्निर्माण करतात, कोलाजेन तयार करण्यात मदत करतात आणि त्वचा तजेलदार ठेवतात. मात्र अति प्रमाणात रेड मीट (Red Meat) खाल्ल्यास त्वचेवर मुरुमे, तेलकटपणा आणि सूज येऊ शकते. म्हणून आठवड्यातून 2-3 वेळा संतुलित प्रमाणात मांस खाणे उत्तम राहते.

भारतात कोणते मांस सर्वाधिक खाल्ले जाते?

eating local meat
मांसहरी

भारतामध्ये मोठा वर्ग मास खाणार आहे. आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त खाणारे मास म्हणजे : चिकन, मासे, अंडी, मटण आहे. हे सहज कुठल्याही भारताच्या कानाकोपऱ्याच्या हॉटेलमध्ये उपलब्ध असते.

आरोग्यासाठी सर्वोत्तम मांस कोणते आहे?

मासे हे सुपरफूड मानले जातात कारण त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले ओमेगा-3, व्हिटॅमिन D, आणि उच्च दर्जाचे प्रथिने (Protein) असतात.
हे घटक आपल्या हृदय, मेंदू, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी ठरते.

मांस खाणे बंद केल्यावर काय होते?

मांस खाणे बंद केल्यावर शरीरात आणि पर्यावरणात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. आजकाल अनेक लोक आरोग्य, प्राणीसंवर्धन आणि पर्यावरण यासाठी शाकाहार (Vegetarian lifestyle) स्वीकारत आहेत. मास बंद केल्याचे अनेक फायदे होतात जसे की हृदयाचे आरोग्य सुधारते, त्वचा आणि पचन सुधारते, ऊर्जेत वाढ होते, वजन नियंत्रणात राहते अशे अनेक मास बंद केल्याचे फायदे आपण होतात. 

कोणते जीवन चांगले – शाकाहारी की मांसाहारी?

Eating local meat
शाकाहारी

शाकाहारी जीवनशैली आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अधिक अनुकूल मानली जाते.

मांसाहारी आहारमध्ये प्रथिने (Protein), लोह (Iron), आणि व्हिटॅमिन B12 मिळते, पण जास्त प्रमाणात खाल्यास कोलेस्टेरॉल वाढू शकतो.

भाज्या, फळे आणि आवश्यक प्रमाणात घेणे हेच सर्वोत्तम आहार आहे

जगभरात सर्वात जास्त कोणते मांस खाल्ले जाते?

चिकन (कोंबडीचे मांस) हे जगभरात सर्वात जास्त खाल्ले जाणारे मांस आहे. त्यानंतर डुकराचे मांस (Pork) आणि गोमांस (Beef) यांचा क्रम लागतो जगभरातील लोकांची मागणी अनेक मांस पद्धतीमध्ये आहे….

Categories
ऑटोमोबाईल

Rohit Sharma batting : माझी क्रिकेट पट्टू रोहित शर्मा शिवाजी पार्क मध्ये बॅटिंग करताना!

शिवाजी पार्कमध्ये Rohit sharma batting करताना आज दिसला. शिवाजी पार्कमध्ये अनेक चाहते रोहित शर्माला बॅटिंग करताना पहिले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीसाठी तो नेट्समध्ये तुफान फटकेबाजी करताना दिसला. चाहत्यांना रोहितचा दमदार फॉर्म आणि त्याची क्लासिक टाइमिंग पुन्हा पाहायला मिळाली. रोहित शर्माने अनेक धडे शिवाजी पार्क या मैदाना मधून गिरवले तसेच अनेक खेळाडू आपले धडे मुंबई च्या शिवाजी पार्क मधून सुरुवात केलेले तसेच मुंबईतील शिवाजी पार्क हे भारतीय क्रिकेटचे जन्मस्थान मानले जाते.

Rohit Sharma batting: रोहित शर्मा बॅटिंग करताना त्याचा दमदार शॉट नी त्याचा लेंबोरगिनी गाडी च्या काच फुटला. या शॉट चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहितच्या फटक्याची ताकद पाहून चाहत्यांनी त्याच्या बॅटिंग पॉवरचे कौतुक केले. चहात्यानी बॅटिंगचा भरपूर आनंद घेतला.

रोहितच्या फॉर्ममध्ये परतण्याचे संकेतही या सरावातून दिसत आहेत. शिवाजी पार्कमधील ही घटना मुंबईतील क्रिकेटप्रेमींसाठी एक खास क्षण ठरला आहे.

टीममधून वनडे कर्णधारपद गेल्यानंतरही रोहितने स्वतःला पुन्हा सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. त्याच्या नेट प्रॅक्टिसमध्ये फिटनेस, शॉट सिलेक्शन आणि पॉवर हिटिंगवर विशेष भर दिसून आला. क्रिकेट विश्लेषकांच्या मते, रोहित पुन्हा एकदा मोठी इनिंग खेळण्यासाठी तयार आहे.

Categories
Health

लिव्हर खराब होण्याची लक्षणे आणि त्यावर उपाय!!!

लिव्हर शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. लिव्हर खराब होण्याची लक्षणे अनेक आहेत. लिव्हर (यकृत) हा  रक्तातील विषारी घटक फिल्टर करतो, पचनासाठी पित्त तयार करतो आणि उर्जेचा साठा ठेवतो. पण जेव्हा लिव्हर खराब होऊ लागतो, तेव्हा शरीरात काही लक्षणे दिसू लागतात जी वेळेवर ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. लिव्हर खराब झाल्यावर Liver Transplant केले जाते. लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर रुग्णाला औषधोपचार, नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैली राखणे अत्यावश्यक राहते.

लिव्हर सूज येण्याची कारणे!

लिव्हर खराब होण्याची लक्षणे
Liver

लिव्हर सूज (Liver Swelling किंवा Hepatomegaly) हा एक गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये लिव्हर सामान्यपेक्षा मोठा होतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. फॅटी लिव्हर, हर्पेटायटिस A, B किंवा C, मद्यपानाची जास्त प्रमाणात सवय, आणि जंक फूडचे जास्त सेवन हे मुख्य कारणे आहेत. तसेच मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, लिव्हरचे आजार किंवा औषधांचे साइड इफेक्ट्स देखील लिव्हर सूज निर्माण करतात. काही वेळा हृदयाची समस्या किंवा किडनीचे आजार देखील लिव्हर सूजास कारणीभूत ठरतात. लिव्हर सूज असल्यास डोकेदुखी, पोटात दुखणे, त्वचेवर पिवळसरपणा आणि थकवा जाणवतो. लिव्हर सूज टाळण्यासाठी संतुलित आहार, मद्यपान टाळणे, नियमित व्यायाम आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आवश्यक आहे.

फॅटी लिव्हर साठी घरगुती उपाय!!

लिव्हर खराब होण्याची लक्षणे
घरगुती उपाय

फॅटी लिव्हर हा आजकालचा सामान्य पण गंभीर आजार आहे. चुकीचा आहार, मद्यपान आणि निष्क्रिय जीवनशैली यामुळे लिव्हरमध्ये चरबी साठते. फॅटी लिव्हर साठी घरगुती उपायांमध्ये सर्वप्रथम संतुलित आहार घ्यावा. दररोज लिंबू पाणी, आवळा रस आणि हळदीचे दूध घेतल्याने लिव्हर शुद्ध राहते. ग्रीन टी आणि लसूण हे चरबी कमी करण्यात मदत करतात. तेलकट, तळलेले आणि जंक फूड टाळा. रोज 30 मिनिटे चालणे किंवा योगा केल्याने लिव्हरमधील चरबी कमी होते. पुरेसे पाणी प्या आणि मद्यपान पूर्णपणे बंद करा. तसेच आवळा, तुळस, कारल्याचा रस हे लिव्हर साठी नैसर्गिक टॉनिक आहेत. नियमित तपासणी करून आरोग्याची काळजी घ्या हे महत्वपूर्ण ठरते…


यकृताच्या समस्यांमुळे चेहरा फुगू शकतो का?

यकृताच्या समस्यांमुळे मुरुमे होतात का?

यकृताच्या आजारात त्वचेतील बदल कोणते असतात?

यकृताच्या नुकसानीमुळे त्वचा काळी पडू शकते का?

लिव्हर खराब होण्याची लक्षणे मुळे चेहरा फुगू शकतो का?

लिव्हर खराब होण्याची लक्षणे

Liver च्या समस्यांमुळे चेहरा फुगणे शक्य आहे. लिव्हर शरीरातील द्रव संतुलन नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा यकृत योग्य प्रकारे कार्य करत नाही, तेव्हा शरीरात अतिरिक्त द्रव साठतो, ज्यामुळे हात, पाय तसेच चेहरा सूजतो. याला फेशियल एडिमा असेही म्हणतात. यकृताचे गंभीर आजार जसे की सिरोसिस किंवा फॅटी लिव्हर हे देखील चेहर्‍यावर फुगण्याचे लक्षण देऊ शकतात.

लिव्हर दुषित झाल्यानंतर चेहरा फुगण्याची लक्षणे!!

• डोळ्यांच्या भोवती सूज

• गाल आणि कपाळावर सूज

• चेहर्‍यावर चमकदार किंवा फिकट त्वचा

• अंगात आणि पायांमध्ये साठलेला द्रव

यकृताच्या (liver) समस्यांमुळे मुरुमे होतात का?

लिव्हर खराब होण्याची लक्षणे
Pimples problem

लिव्हरच्या समस्यांचा थेट परिणाम त्वचेमध्ये दिसतो आणि यामुळे मुरुमे (Acne) होऊ शकतात. लिव्हवर हे शरीरातील मुख्य विषारी पदार्थ दूर करणारे अवयव आहे. जेव्हा लिव्हर व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा शरीरातील टॉक्सिन्स त्वचेतून बाहेर येतात. यामुळे त्वचा सडल्यासारखी दिसते, तैलकटपणा वाढतो आणि मुरुमे निर्माण होतात.

लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जास्त तेलकट, जंक फूड, अल्कोहोल व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. हिरव्या भाज्या, फळे, मसूर व दाल, ओट्स, नट्स व लिंबूयुक्त पाणी सेवन करा. पुरेशी झोप, व्यायाम आणि पुरेसे पाणी पिणे हे देखील यकृतासाठी फायदेशीर आहे.

यकृताच्या( liver) आजारात त्वचेतील बदल कोणते असतात?

लिव्हर खराब होण्याची लक्षणे
त्वचा बदल

यकृताच्या आजारांमुळे त्वचेत अनेक लक्षणे दिसू लागतात, कारण यकृत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे मुख्य कार्य करते. जेव्हा यकृत नीट काम करत नाही, तेव्हा टॉक्सिन्स त्वचेतून बाहेर येतात आणि त्वचेचा रंग, बनावट व आरोग्य प्रभावित होतात.

तुझ्या मध्ये दिसून येणार आहे बदल :

पिवळसर त्वचा होने

मुरुमे व डाग दिसणे

खवखवाट व कोरडेपणा होने

खुणा व पिग्मेंटेशन होने

यकृताच्या ( liver) नुकसानीमुळे त्वचा काळी पडू शकते का?

Black skin

यकृत शरीरातील मुख्य विषारी पदार्थ काढण्याचे काम करत राहते. जेव्हा Liver नीट कार्य करत नाही, तेव्हा शरीरातील टॉक्सिन्स त्वचेतून बाहेर येतात. यामुळे त्वचा फिकट, सडलेली किंवा काळसर दिसू लागते.

Liver च्या कमजोरीमुळे जॉन्डिससारखे लक्षण देखील दिसू शकते, ज्यामध्ये त्वचा पिवळसर किंवा काही ठिकाणी गडद होऊ शकते. शिवाय, तैलकटपणा वाढणे, मुरुमे, डाग किंवा कोरडेपणा देखील त्वचेवर दिसू शकतात.

Categories
झकास्टीम्स अपडेट्स

Mahabaleshwar trip from mumbai – pune now very special

मुंबईकर आणि पुणेकर यांच्यासाठी महाबळेश्वर ट्रीप ठरेल एकदम zakas. Mahabaleshwar trip करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि रोमांचक झाले आहे. पश्चिम घाटातील हे प्रसिद्ध हिल स्टेशन निसर्गप्रेमी, फोटोग्राफी लव्हर्स आणि कुटुंबीयांसाठी एक परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे. नवीन रोड कनेक्टिव्हिटी, आरामदायी हॉटेल्स आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्समुळे Mahabaleshwar trip from Mumbai-Pune हा अनुभव अविस्मरणीय ठरतो.

Mahabaleshwar trip from mumbai
Mahabaleshwar points

Mahabaleshwar मध्ये Arthur Seat Point, Venna Lake, Mapro Garden, आणि Pratapgad Fort ही ठिकाणे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. येथे स्थानिक स्ट्रॉबेरी फार्म पाहणे, गरम चहा आणि कॉर्न भजीचा आनंद घेणे हा एक वेगळाच अनुभव देतो.

मुंबईहून साधारण 5 तास आणि पुण्याहून 3 तासांच्या अंतरावर असलेले महाबळेश्वर आता वीकेंड ट्रिपसाठी उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही शांतता, हिरवळ आणि थंड हवामानाचा आनंद घ्यायचा विचार करत असाल, तर तुमची Mahabaleshwar trip from Mumbai-Pune आजच प्लॅन करा!

when should we visit mahabaleshwar : महाबळेश्वरला कोणत्या महिन्यात भेट द्यावी?

महाबळेश्वरला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते जून हे महिने योग्य ठरतात, कारण या काळात हवामान समतोल असते आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हा काळ योग्य असते.  

ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत : हवामान थंडगार आणि आल्हाददायक असते. Honeymoon couples आणि निसर्गप्रेमींसाठी हा सर्वोत्तम सीझन राहते…

मार्च ते जून मध्ये: हवामान सुखद असते, फळबागा आणि स्ट्रॉबेरी फार्म्स पाहण्यासाठी उत्तम वेळ असते…

महाबळेश्वर का प्रसिद्ध आहे : Why Mahabaleshwar is Famous

Mahabaleshwar trip from mumbai
Mahabaleshwar points

महाबळेश्वर प्रसिद्ध होण्याचे अनेक कारणे आहेत तसेच महाबळेश्वरला लागलेले अनेक नैसर्गिक देन आहे.  महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. ते आपल्या स्ट्रॉबेरी फार्म्स, सुंदर पॉइंट्स, शांत हवामान आणि निसर्गरम्य व्हॅली व्यूज साठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे प्राचीन महाबळेश्वर मंदिर, वेण्णा लेक, आणि आर्थर सीट पॉईंट यांसारखी अनेक आकर्षक स्थळे आहेत.

महाबळेश्वरमध्ये भेट देण्यासारखी ठिकाणे: Places to Visit in Mahabaleshwar

महाबळेश्वर मंदिर हे १२०० वर्षांपूर्वीचे शिवमंदिर असून, येथे भगवान शंकराच्या “त्र्यंबकेश्वर” स्वरूपाची पूजा होते. मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो, त्यामुळे हे स्थळ पंचगंगा मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

महाबळेश्वर मध्ये अनेक भेटण्यासारखे ठिकाण आहेत जसे की

  • महाबळेश्वर मंदिर
  • आर्थर सीट पॉईंट (Arthur Seat Point)
  • विल्सन पॉईंट (Wilson Point)
  • वेनना लेक (Venna Lake)
  • लिंगमळा धबधबा (Lingmala Waterfall)

महाबळेश्वर हवामान किती असतो : Mahabaleshwar Weather

Mahabaleshwar Weather

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण समजले जाते. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान तापमान 10°C पर्यंत खाली जाते. या हवामानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लांबून लांबून   येतात

🔸Mahabaleshwar Height: महाबळेश्वर  उंची किती!

महाबळेश्वर समुद्रसपाटीपासून अंदाजे 1,353 मीटर (4,439 फूट) उंचीवर वसलेले आहे. त्यामुळे येथे वर्षभर थंड हवामान असते.

महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी कोणत्या महिन्यात पिकतात?

स्ट्रॉबेरी

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी सिझन नोव्हेंबरपासून सुरू होऊन मार्चपर्यंत चालतो. या स्ट्रॉबेरीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या महिन्यामध्ये  गर्दी करतात.

Planning Mahabaleshwar trip from mumbai

मुंबईहून महाबळेश्वरला जाण्याचे नियोजन : Mahabaleshwar जाण्यासाठी अनेक योजना आहेत जसं की कॅब, बस,कार अशाप्रकारे तुम्ही प्रवास करू शकता, मुंबई वरून सुमारे 230 किलोमीटर महाबळेश्वर अंतर येते. साधारणता 5/6 घंटे या प्रवासाला लागतात. पुणे ते महाबळेश्वर अंतर  (pune to mahabaleshwar distance ) हे अंतर 125 किलोमीटर येते. साधारणत 2/3 घंट्याचा प्रवास आहे.

Categories
झकास्टीम्स अपडेट्स

Diwali shopping online 2025 : अशाप्रकारे करा दिवाळीची ऑनलाइन शॉपिंग

महाराष्ट्रात दिवाळी हा सण फक्त धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. तसेच दिपवाली मध्ये Diwali shopping online करून या दिवाळीत आपल्या घरासाठी नवीन वस्तू, कपडे आणि भेटवस्तू खरेदी करून दिवाळी आणखीन विशेष बनवा. दिवाळी हा हिंदू , जैन आणि शीख धर्मातील प्रमुख धार्मिक सणांपैकी एक आहे. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही हा प्रत्येक व्यक्तीमधील परमात्म्याचा उत्सव आहे. दिवाळी हा सण अध्यात्मिक महत्त्व पटवून देणाराही आहे. दिवाळी ही भगवान महावीरांच्या आध्यात्मिक प्रबोधनाचे प्रतीक आहे.

Diwali shopping online 2025 मध्ये काय काय खरेदी करावे?

दीपावली या सणांमध्ये अनेक गोष्टी आपणाला लागतात जसं की घर सजवण्यासाठी (home decor) वस्तू, लाइट्स, रांगोळी, वॉल डेकोर, दिवे, कुशन कव्हर्स तसेच लक्ष्मीपूजन ला लागणारे साहित्य तसेच आपणाला लागणारे कपडे किंवा ॲक्सेसरीज आपण सहज पद्धतीने online shopping करून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट होऊ शकतात.

Diwali shopping online कशी करायची!!

Diwali shopping online करण्यासाठी अनेक ई-कॉमर्स वेबसाईट आहेत जसे की  Flipkart : Amazon : Myntra : Meesho या वेबसाईट वरती जाऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करून चांगल्या प्रमाणात ऑफर घेऊ शकतात.

दिवाळीचा आदर कसा करावा?

हा सण फक्त दिवे लावण्यापुरता नसून आपल्या परंपरेचा सन्मान, निसर्गाचा आदर आणि सामाजिक एकतेचा संदेश देतो. चला पाहूया दिवाळीचा आदर कसा करावा आणि हा सण अधिक अर्थपूर्ण कसा साजरा करावा;

परंपरेचा सन्मान कारणे
• पर्यावरणपूरक दिवाळी    साजरी करा
• समाजातील सर्वांना आनंद द्या
• परंपरेनुसार पूजा आणि मंत्रोच्चार करा
• लक्ष्मीचे स्वागत कारणे हा दीपावलीचा उद्देश आहे

Diwali decoration for home : दिवाळीसाठी घर कसे डिझाइन करावे?

Diwali shopping online
Diwali decoration

• दिवाळी पूजा परिसर कसा सजवायचा?

• लक्ष्मीपूजनात सजावट कशी करावी?

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि या सणात घराची सजावट (Diwali Decoration for Home) हे सर्वात महत्त्वाचे आकर्षण असते. आपले घर उजळवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी काही सोप्या पण आकर्षक सजावट कल्पना वापरून घराला चांगली डिझाईन देऊ शकतो.

सुरुवात करा घराची साफसफाई करून — कारण स्वच्छता हीच शुभतेची पहिली पायरी आहे. दरवाज्यावर सुंदर तोरण, रांगोळी आणि कंदील लावा. या पारंपरिक सजावटीमुळे घराला उत्सवाचा स्पर्श मिळतो. दिवाळीच्या रात्री घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तेलाचे दिवे किंवा LED दिवे लावल्यास घर प्रकाशमान होते आणि लक्ष्मी आगमनासाठी वातावरण निर्मिती होते….

दिवाळी पूजा परिसर कसा सजवायचा?

Diwali shopping online
Diwali pooja

प्रवेशद्वार आणि पूजा जागेवर सुंदर रंगीत रांगोळी काढा नंतर पूजा करण्यापूर्वी परिसर स्वच्छ करून गंगाजळ किंवा कापूर/ दुप लावून ठेवा हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. झेंडू, गुलाब, कमळ अशा ताज्या फुलांनी पूजा मंडप सजवा तसेच स्वयंपाकघरात आणि हॉलमध्ये फुलांची माळ, आरती थाळी डेकोरेशन, आणि लक्ष्मी-गणपती मूर्तीच्या आजूबाजूला सजावट केल्याने सणाचे सौंदर्य वाढते.

लक्ष्मीपूजनात सजावट कशी करावी?

लक्ष्मीपूजन या दिवशी घरात महालक्ष्मी, भगवान विष्णू आणि गणपतीची पूजा केली जाते हा दिवस सर्वात महत्त्वाचा समजला जातो. लक्ष्मीपूजन करताना  लाल, पिवळ्या किंवा केशरी रंगाचे रेशमी वस्त्र पूजा स्थळी अंथरा. मोगरा, झेंडू, गुलाब या फुलांच्या माळांनी दरवाजा आणि पूजा जागा सजवा. मूर्तीच्या  आजूबाजूला चांदीचे नाणे, तांदूळ, फुलं आणि फळं ठेवा. मग या गोष्टी करून तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता.

Categories
Health

Weight loss trick: वजन कमी करण्यासाठी उपाय!

आजच्या धावपळीच्या जीवनात वजन कमी करणे अनेकांसाठी आव्हानात्मक वाटते. अनेक जण पटकन वजन कमी करण्यासाठी उपाय शोधत असतात  पण काळजी करू नका! योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सुसंगत जीवनशैलीने तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता.

वजन कमी करण्यासाठी उपाय
संतुलित आहार
  1. सकाळची कोमट पाणी पिने
  2. संतुलित आहार
  3. दररोज व्यायाम करा
  4. पुरेशी झोप घ्या
  5. पाणी अधिक प्या

अनेक जण पटकन वजन कमी कारण्यासाठी उपाय शोधत असतात किंवा वजन कमी किंवा वाढवण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स किंवा जिममध्ये तासन्‌तास घालवण्याची गरज नसते, नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे म्हणजे शरीराला आणि मनाला संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे.

फिटनेस तज्ज्ञांच्या सांगतात की वजन कमी करण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी सवयी अंगीकारणं करणे आवश्यक आहे. पोटावरील चरबी  कमी करण्यासाठी आहारात छोटे पण सातत्यपूर्ण बदल करा. कारण स्मार्ट पोषण आणि सुसंगतता हाच खरा फॅट लॉस हॅक आहे.

वजन कमी करण्यासाठी काय खावे:  Weight Loss Diet in Marathi

वजन कमी करण्यासाठी आहारात कॅलरी कमी पण पोषक तत्वांनी भरपूर अन्न असणे गरजेचे आहे. जास्त तेलकट, गोड, व तळलेले पदार्थ टाळा आणि नैसर्गिक अन्नपदार्थ निवडा ज्याचा आपणास शरीरावरती फायदा होईल.

ओट्स, मूग डाळ आणि अंकुरित धान्य, फळे, हिरव्या भाज्या, ग्रीन टी किंवा लिंबूपाणी या पदार्थ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात

वजन कमी करण्यासाठी रात्री काय खावे!

रात्री हलके आणि सहज पचणारे अन्न घेणे आवश्यक आहे. रात्री जड, मसालेदार किंवा तळलेले पदार्थ घेऊ नये.रात्री 8 नंतर खाणे टाळा पचन नीट राहते आणि वजन नियंत्रणात ठेवते.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम: Weight Loss Exercise

प्रत्येकाला व्यायाम करणे गरजेचे आहे कारण त्यातून शरीरिक ही स्वस्त राहते तसेच वजनाला नियंत्रणात ठेवते. म्हणून व्यायाम वजन कमी करण्याचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज 30-40 मिनिटे व्यायाम केल्यास परिणाम दिसून येतो.

वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खाऊ नयेत?

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अस्वस्थ आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ टाळणे महत्त्वाचे ठरते. कोणते पदार्थ टाळावेत : जंक फूड, साखरयुक्त पेये, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ हे पदार्थ खाऊ नये.

वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात?

वजन कमी करण्यासाठी भाज्या खाणे महत्त्वपूर्ण ठरते. वजन कमी करण्यासाठी अशा भाज्या खा ज्या कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात. या भाज्या भूक नियंत्रित ठेवतात आणि फॅट बर्न करण्यास मदत करतात.

भाज्या कोणत्या खाव्यात:

वजन कमी करण्यासाठी उपाय
Veg-tables for weight loss

पालक

दुधी भोपळा

गाजर

मटार

ब्रोकली

टोमॅटो


सूर्यनमस्कार केल्याने वजन कमी होते का?

होय ✅

  आरोग्यासाठी सूर्यनमस्कार खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी हा वजन कमी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी योग प्रकार आहे.
दररोज 12 सूर्यनमस्कार केल्याने साधारण 200–250 कॅलरी जळतात त्यातून शरीराला अनेक फायदे होतात जसे की शरीरातील चरबी कमी होते, स्नायू टोन होतात आणि लवचिकता वाढते, हृदयाचे आरोग्य सुधारते, मन शांत राहते आणि झोप चांगली लागते.

रनिंग केल्याने वजन कमी होते का?

रनिंगमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि कॅलरी मोठ्या प्रमाणात बर्न होतात. नियमित रनिंगसोबत संतुलित आहार ठेवला, तर वजन कमी होण्याचा वेग वाढतो.

जेवण कमी केल्याने वजन कमी होते का?

जेव्हा आपण कॅलरी डेफिसिट (Calorie Deficit) मध्ये असतो म्हणजे शरीराला लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा कमी अन्न घेतो तेव्हा शरीर साठवलेल्या चरबीचा वापर करून ऊर्जा तयार करतं. त्यामुळे वजन कमी होतं.

🔸पण अति कमी जेवण (Crash Dieting) केल्याने शरीरातील मेटाबॉलिझम मंदावतो, स्नायू कमी होतात, थकवा येतो आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम मिळत नाही.

🔸योग्य पद्धती म्हणजे — पोषक अन्न, भरपूर पाणी, आणि संतुलित आहार योजना (Protein, Fiber, Good Fats).

रक्तदान केल्याने वजन कमी होते का?

रक्तदान केल्यानंतर सुमारे 450 मिली रक्त कमी होतं, ज्यामुळे काही काळासाठी वजन थोडं कमी दिसतं, पण हे तात्पुरतं असतं. शरीर लवकरच नवीन रक्त तयार करतं आणि वजन पुन्हा पूर्ववत होतं. रक्तदानामुळे आरोग्य चांगलं राहू राहते नवीन रक्तनिर्मिती होते.

Categories
Health

25 High-Protein Foods  Muscle Gain साठी सर्वोत्तम आहार!

High protein Foods खाल्ल्याने आपल्या शरीरातील स्नायू (Muscle), त्वचा, केस, आणि हार्मोन्ससाठी आवश्यक असलेला प्रमुख पोषकतत्त्व (macronutrient) आहे. जर तुम्हाला मसल गेन (Muscle Gain), वजन कमी करणे किंवा ऊर्जा वाढवणे हवे असेल, तर प्रोटीनयुक्त आहार घेणे आवश्यक ठरते..

High-protein Foods खाण्याचे फायदे!

High-Protein Foods 

• मसल गेन होने

• वजन कमी होने

• मेटाबॉलिझम सुधारणा होने

• हाडे व इम्युनिटी मजबूत होने

High-protein foods खाल्याने स्नायूंची वाढ आणि ताकद वाढते तसेच वजन कमी होने प्रोटीनमुळे पोट भरल्यासारखे वाटते. मेटाबॉलिझम मुळे चरबी जाळण्याची क्षमता वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.


High-Protein Foods List

🥩प्राणीजन्य प्रोटीन (Animal Protein Sources)

•अंडी (Eggs)
•कोंबडीचे मांस (Chicken)
•मासे (Fish – सॅल्मन, ट्यूना, रोहू)
•दूध, दही, पनीर (Milk, Yogurt, Cottage Cheese)
•मटण (Lean Meat – प्रमाणात खावे)

🌱वनस्पतीजन्य प्रोटीन (Plant Protein for good for health )

•डाळी (मुग, मसूर, तूर)
•हरभरा व राजमा
•सोयाबीन व टोफू
•मूग स्प्राऊट्स
•बदाम, अक्रोड, काजू
•चिया बिया, फ्लॅक्स सीड्स, भोपळ्याच्या बिया
•क्विनोआ, ओट्स

दररोज किती प्रोटीन घ्यावे:Daily Protein Intake in Marathi

आरोग्यदायी प्रौढ व्यक्तीसाठी प्रोटीनची गरज वजनानुसार मोजली जाते जसेकी

शरीराच्या वजनाच्या प्रति किलो 0.8 – 1 gm protein घेणे आवश्यक ठरते. जर 60 किलो वजन असल्यास 48g – 60g Protein घ्यावे.

एका अंड्यामध्ये किती प्रथिने असतात? 🥚

High-Protein Foods
Egg Protein

मध्यम आकाराच्या एका अंड्यामध्ये साधारण 6 ते 7 gm प्रथिने असतात.

•अंड्याचा पांढरा भाग (Egg White) → 3.5 ग्रॅम प्रथिने

•अंड्याचा पिवळा भाग (Egg Yolk) → 2.5 ते 3 ग्रॅम प्रथिने

•त्यामुळे व्यायाम करणारे लोक जास्त Egg White खाण्यावर भर देतात.

Categories
Health

6 signs of heart attack: एक महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या 6 चिन्हे

हृदयविकार हे अनेक लोकांचा गंभीर विषय झाला आहे. एक महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या 6 चिन्हे जाणून घेऊयात. हृदयविकार (Heart Attack) हा आजार अचानक होत नाही. त्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देत असतो. दुर्दैवाने आपण हे संकेत दुर्लक्षित केल्यामुळे मोठा धोका निर्माण होतो. संशोधनानुसार हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी साधारण एक महिना आधीच शरीर काही लक्षणे दाखवते.

हृदयविकाराचे ६ महत्त्वाचे सुरुवातीचे लक्षणे 👇

एक महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या 6 चिन्हे
Heart attack sign

1. छातीत वेदना किंवा दडपण येणे.

2. श्वास घेण्यास त्रास होने.

3. अनावश्यक थकवा जनवणे.

4. शरीरात घाम येणे.

5. चक्कर येणे किंवा डोके हलके होणे

6. पचनाशी संबंधित समस्या होने.

छातीत वेदना किंवा दडपण (Chest Pain / Pressure)

हृदयविकाराचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत जडपणा, वेदना किंवा दडपण जाणवणे. ही वेदना हात, मान, पाठ किंवा जबड्यापर्यंत पसरू शकते.
👉 जर अशी वेदना वारंवार होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

श्वास घेण्यास त्रास (Shortness of Breath)

जरा चाललं, जिने चढले किंवा हलकीशी हालचाल केली तरी श्वास घेण्यास त्रास होणे हा हृदयविकाराचा सुरुवातीचा इशारा असू शकतो. याकडे बारकाईने लक्ष द्या.

अनावश्यक थकवा जनवणे (Unusual Fatigue)

विशेष काम न करता पण सतत थकवा जाणवणे, उठल्याबरोबरच शरीरात ऊर्जा नसणे, हे हृदयाशी संबंधित समस्या दर्शवू शकते. महिलांमध्ये हे लक्षण अधिक आढळते.

शरीरात घाम येणे (Sweating)

थंड हवामान असतानाही जास्त घाम येणे किंवा अचानक घाम फुटणे, हा हृदयविकाराचा इशारा असतो. विशेषतः रात्री झोपेतून उठल्यावरही घाम येत असेल तर लक्ष द्यावे.

चक्कर येणे किंवा डोके हलके होणे (Dizziness)

अचानक चक्कर येणे, डोकं हलके होणे किंवा बेशुद्ध पडण्यासारखी अवस्था निर्माण होणे हे हृदयाच्या रक्तपुरवठ्यातील अडथळ्याचे लक्षण असू शकते. मग याकडे लक्ष देऊन आपली काळजी करणं महत्त्वाचे आहे.

पचनाशी संबंधित समस्या!

पोटात जडपणा, अपचन, मळमळणे, ओकारी येणे यांसारखी लक्षणेही हृदयविकारापूर्वी दिसतात. लोक याला सहसा गॅस्ट्रिक प्रॉब्लेम समजतात, पण हे हृदयविकाराचे संकेत असू शकतात.


हार्ट अटॅक आल्यावर काय करावे: Heart attack alyavar kay karave in marathi

हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होणे, अटॅक आल्यानंतर माणसाला भीती वाटायला सुरू होते. त्यामुळे हार्ट अटॅकच्या वेळी तात्काळ योग्य उपाय करणे महत्त्वाचे आहे. शांत राहा आणि लगेच मदत मागवा, रुग्णाला आरामदायी स्थितीत बसा, जवळ असल्यास Aspirin (300 mg चघळून घ्या), वाहनाने स्वतः रुग्णालयात जाणे टाळा.


हृदयविकार टाळण्यासाठी काय करावे?

नियमित व्यायाम करा
• तणाव कमी ठेवा
• तळलेले, तेलकट व जंक फूड टाळा
• धूम्रपान व मद्यपानापासून दूर रहा
• नियमित तपासणी करून घ्या


स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे!!

स्त्रियांमध्येही मोठ्या प्रमाणावर आढळणारी गंभीर समस्या झाली आहे. अनेक वेळा स्त्रियांना हृदयविकाराची लक्षणे वेगळी असतात जसे की जबडा व खांद्यामध्ये वेदना, छातीत वेदना किंवा जळजळ, श्वास घेण्यास त्रास, उलटी होणे किंवा पोटात दुखणे जवळपास असे लक्षणे दर्शवतात.


हृदयविकाराचा झटका नेहमीच गंभीर असतो का?

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा अनेक वेळा गंभीर असतो, कारण तो थेट हृदयाच्या स्नायूंवर परिणाम करतो. मात्र, प्रत्येक झटका एकसारखा नसतो. काही प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात आणि व्यक्ती वेळेवर उपचार घेतल्यास धोका टाळता येतो. पण उपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. हृदयविकाराचा झटका गंभीर असला की रक्तपुरवठा थांबतो, हृदयाचे स्नायू नुकसान होतात.


हृदयविकाराचा झटका आल्यास काय करू नये?

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यास काही चुकीची पावले उचलल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते. Heart attack आल्यास विलंब करू नका, स्वतः वाहन चालवू नका, जास्त शारीरिक हालचाल करू नका, घाबरू नका व इतरांना घाबरवू नका हृदय विकार आल्यानंतर या गोष्टी करू नये.


कोणते फळ हृदय शुद्ध करते: Which fruit cleanses the heart

एक महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या 6 चिन्हे
Best fruits for heart

•डाळिंब (Pomegranate)

•सफरचंद(Apple)

•संत्रे व लिंबूवर्गीय फळे(Citrus Fruits)

•द्राक्षे (Grapes)

•पपई (Papaya)

हे हृदयासाठी फायदेशीर ठरते!

हृदय हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयव आहे. योग्य आहार घेतल्याने हृदय निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. काही फळांमध्ये असे नैसर्गिक घटक (antioxidants, fiber, vitamins, minerals) असतात जे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून हृदय शुद्ध करतात व धमन्या स्वच्छ ठेवतात.


कोलेस्ट्रॉलसाठी कोणते गरम पेय हानिकारक आहेत?

कोलेस्ट्रॉल वाढवणारी हानिकारक❌ गरम पेये

• जास्त साखर घातलेला चहा( Milk Tea with Sugar)

• क्रीमसह कॉफी (Coffee with Cream & Sugar)

• हॉट चॉकलेट (Hot Chocolate)

• पॅकेज्ड गरम ड्रिंक्स (Packaged Hot Drinks)

• पॅकेज्ड गरम ड्रिंक्स (Packaged Hot Drinks)

कोलेस्ट्रॉलसाठी चांगले गरम पेय (पर्याय)

✅ ग्रीन टी

✅ हर्बल टी

✅ ब्लॅक कॉफी

✅ हळदीचे दूध

या गोष्टीचा कोलेस्ट्रॉल साठी फायदेशीर ठरतात!


हृदयरोग असल्यास कोणते फायदे मिळवू शकतो?

हृदयरोग आल्यावर लोक आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागतात. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, आणि ब्लड शुगर तपासणे यावर लक्ष दिले जाते म्हणून आरोग्याबाबत सजगता वाढते जसेकी जीवनशैलीत सुधारणा होते, शरीराचे गुणवत्ता,  औषधोपचार व उपचारांची माहिती मिळते, जीवनाची गुणवत्ता सुधारते, कुटुंब आणि सामाजिक आधार मिळतो, धोके ओळखण्याची क्षमता यातून मनुष्य सतर्कता बाळगतो.


हृदयासाठी कोणता आहार सर्वोत्तम आहे?

Protein food

(Good health )हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार खूप महत्वाचा आहे. योग्य आहारामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो, रक्तदाब संतुलित राहतो आणि हृदयविकाराच्या जोखमी कमी होतात. त्यामुळे हृदयासाठी सर्वोत्तम आहार महत्वपूर्ण ठरते जसे की फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, हृदयासाठी निरोगी फॅट्स, प्रोटीनयुक्त पदार्थ जसेकी: डाळी, हरभरा, मूग, सोयाबीन, कमी फॅटयुक्त कोंबडी/मासे.


Categories
झकास्टीम्स अपडेट्स

Flipkart Shopping Tricks: कमी पैशात जास्त खरेदी करण्याचे रहस्य

Online shopping मध्ये Flipkart ही भारतातील सर्वात लोकप्रिय ई-कॉमर्स ( E-Commerce ) साइट आहे. योग्य Flipkart shopping tricks आणि मार्गदर्शन वापरल्यास तुम्ही Flipkart वर खूप बचत करू शकता. चला तर जाणून घेऊया Flipkart शॉपिंग टिप्स:

Flipkart Shopping Tricks
Shopping tricks

• Flipkart सेल आणि ऑफर्सवर लक्ष ठेवा!
• Product रिव्ह्यू आणि रेटिंग्स वाचा!
• Discount तुलना, सुपरकॉइन्स वापर करा!
• बँक ऑफर्स आणि कॅशबॅक वापरा!
• Flipkart Plus मेंबरशिपचा फायदा घ्या!
• रिटर्न पॉलिसी वाचा!
• कूपन कोड्स वापरा!

Flipkart Shopping Tricks आणि ऑफर्सवर लक्ष ठेवा!

ऑफर्स मोठ्या प्रमाणात Big Billion Days, Independence Day Sale, Diwali Sale यांसारख्या सेलमध्ये येते, या sale मध्ये जबरदस्त डिस्काऊंट मिळतात. मोठी खरेदी या दिवसात करणे फायदेशीर ठरते.

Product रिव्ह्यू आणि रेटिंग्स वाचा!

Flipkart वरती खरेदी करण्यापूर्वी युजर्सचे रिव्ह्यू वाचा आणि प्रॉडक्टची रेटिंग तपासा. रिव्ह्यू आणि रेटिंग मुळे product ची गुणवत्ता समजून येते तसेच नकली किंवा दर्जाहीन वस्तू घेण्याचा धोका कमी होतो.

Discount तुलना, सुपरकॉइन्स वापर करा!

Flipkart खरेदीवर तुम्हाला SuperCoins मिळतात. हे कॉइन्स पुढच्या खरेदीत डिस्काऊंटसाठी वापरता येतात.

Bank Offers आणि कॅशबॅक वापरा!

Flipkart दरवेळी वेगवेगळ्या बँकांसोबत विशेष ऑफर्स आणते. HDFC, ICICI किंवा SBI कार्ड वापरल्यास अतिरिक्त 10% सूट राहते तर याचा लाभ घेऊ शकतात…

Flipkart Plus मेंबरशिपचा फायदा घ्या!

ऑनलाइन शॉपिंगमध्ये जास्तीत जास्त बचत करायची असेल तर Flipkart Plus Membership हा उत्तम पर्याय आहे. या मेंबरशिपमुळे ग्राहकांना अनेक विशेष फायदे मिळतात. जसेकी स्पेशल डिस्काउंट्स, अर्ली ऍक्सेस, पार्टनर ऑफर्स, फ्री डिलिव्हरी अशा पद्धतीने flipkart मेंबरशिप चे फायदा होतो..

रिटर्न पॉलिसी वाचा!!

आपण ऑनलाइन खरेदी करताना उत्पादन परत करण्याची किंवा बदलण्याची आवश्यकता असू शकते. प्रत्येक कंपनीची रिटर्न पॉलिसी वेगळी असते. रिटर्न पॉलिसी वाचणे महत्त्वाचे आहे कारण त्यातून तुम्हाला परत करण्याचा कालावधी, परत करण्याची अटी, पैसे परत मिळण्याची पद्धत या गोष्टी समजून येतात.

कूपन कोड्स वापरा!!

कूपन कोड्स वापरल्यास मूळ किमतीवर अतिरिक्त सवलत मिळते. हे पैसे वाचवण्यासाठी उत्तम मार्ग आहे. Flipkart चे काही कूपन कोड्स फेस्टिव्हल सेल, बिग बिलियन डेज सेल किंवा नवीन लॉन्चिंगवर लागू होतात. यामुळे तुमच्या खरेदीवर जास्त फायदा मिळतो.


which sale is best in flipkart : फ्लिपकार्टमध्ये कोणती विक्री सर्वोत्तम आहे!!

Flipkart Shopping Tricks
Best sale in flipkart

Big Billion Days फ्लिपकार्टवर सर्वात मोठी आणि फायदेशीर सेल आहे. त्यात स्मार्टफोन, लॅपटॉप, फॅशन, घरगुती सामान या सर्व गोष्टींवर प्रचंड सूट मिळते, त्यामुळे शॉपिंगसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. त्यामुळे बिग बिलियन डेज सर्वोत्तम Best सेलर काळ असतो.

Which is the highest selling category on Flipkart: फ्लिपकार्टवर सर्वाधिक विक्री होणारी श्रेणी कोणती आहे..

Flipkart वरील सर्वाधिक विक्री होणारी श्रेणी 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे. या श्रेणीमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि इतर गॅझेट्सचा समावेश होतो.  फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’ सारख्या विक्री कार्यक्रमांमध्ये स्मार्टफोनसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

is flipkart good for buying phones: फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट चांगले आहे का

होय… फोन खरेदीसाठी फ्लिपकार्ट एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. फ्लिपकार्टवर विविध ब्रँड्सचे स्मार्टफोन उपलब्ध असून, ते विविध किमतीच्या श्रेणींमध्ये मिळतात. त्यावर नियमितपणे आकर्षक ऑफर्स, सवलती आणि एक्सचेंज योजनाही उपलब्ध राहते…

Where should i complain about flipkart for refund: फ्लिपकार्टकडून परतफेडीसाठी मी कुठे तक्रार करावी

Flipkart वरती ऑर्डर केल्यानंतर कदाचित आपल्या पार्सल मध्ये मिसिंग किंवा डॅमेज प्रॉडक्ट येतो त्याला रिफंड किंवा रिप्लेस करता येते…

Flipkart चा app किंवा website वर जाऊन तक्रार करा….!

•आपल्या ऑर्डरमध्ये लॉगिन करा.
•“My Orders / माझ्या ऑर्डर्स” विभागात जा.
•ज्या प्रॉडक्टसाठी रिफंड हवा आहे तो निवडा.
“Return / रिटर्न” किंवा “Refund / परतफेड” बटण क्लिक करा.
•रिटर्न किंवा रिफंडचे कारण निवडा आणि सबमिट करा.
नोट: फ्लिपकार्ट रिफंड पॉलिसी प्रॉडक्टवर अवलंबून बदलते.

फ्लिपकार्ट ११ रुपयांचा सेल काय आहे: Flipkart rs. 11 sale माहिती!!

या सेलमध्ये Flipkart काही निवडक वस्तूंवर जसे की मोबाईल ॲक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स, घरगुती वस्तू, फॅशन प्रॉडक्ट्स etc या गोष्टी वर फक्त ११ रुपयांत खरेदीची संधी देते. हा सेल सहसा Big Billion Days, Festive Dhamaka, Freedom Sale किंवा Special Offer Days च्या वेळी आयोजित केला जातो. यामध्ये मर्यादित वेळ आणि मर्यादित स्टॉक असतो, त्यामुळे जो प्रथम खरेदी करेल त्याला फायदा होतो.

Categories
Health

Leg Pain :पाय दुखणे: कारणे, लक्षणे आणि सोपे घरगुती उपाय 

Leg pain : पाय दुखणे ही सर्व सामान्यांची अडचण झाली आहे. एक काळा होता त्या काळामध्ये वृद्ध  माणसाचे पाय दुखायचे हल्ली सामान्य माणसांमध्ये पाय दुखी लक्षण आढळून यायला लागलेत. पाय दुखणे मध्ये कधी हलक्या वेदना तर कधी तीव्र दुखणे असे लक्षण दिसते. पायदुखीमुळे चालणे, उभे राहणे किंवा दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो.

Leg Pain ( पाय दुखणे )
Leg pain

गुडघ्याला सूज का येते!

गुडघ्याला सूज येणे याला वैद्यकीय भाषेत (Knee Swelling) किंवा (Water on the Knee) असे म्हटले जाते. गुडघ्यातील सांध्यामध्ये द्रव जमा झाल्यामुळे, जखम, इजा किंवा काही आजारांमुळे गुडघा सुजतो. पायांमध्ये आलेली सूज (Leg Swelling) ही शरीरात द्रव साठणे, इजा होणे, हाड मोडणे, स्नायू दुखापत, रक्तदाबातील बदल किंवा हृदय-यकृत-मूत्रपिंडाशी संबंधित आजार यामुळे होऊ शकते.

गुडघेदुखीसाठी कोणता आहार सर्वोत्तम आहे!

कॅल्शियम, व्हिटॅमिन D, अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन, या पद्धतीने तुमी आहार घेऊ शकतात, विशेष:साखर व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा ❌

पाय दुखणे कशे थांबवायचे!

पाय दुखण्याचे थांबवायचे असतील क्रिया करा – पाय दुखत असल्यास पाय उंच ठेवून विश्रांती द्या, झोपताना पाय उंच ठेवणे फायदेशीर ठरते. हे सूज कमी करण्यास मदत करते आणि रक्ताभिसरण सुधारते. ताण किंवा स्नायू दुखत असल्यास गरम पॅक लावा : सूज असल्यास थंड पॅक लावा. दिवसातून 2–3 वेळा 15–20 मिनिटे याचा वापर करावा.

गुडघे दुख असल्यास काय करू नये?

Leg pain ( पाय दुखी )

गुडघे दुखत असल्यास काही गोष्टी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण चुकीचे वागणे दुखणे वाढवू शकते किंवा जखम गंभीर करू शकते.

• अत्याधिक वजन आणि दबाव टाळा

• गुडघ्याला जोराचा किंवा अचानक दबाव देणे टाळा

• गुडघ्यावर जास्त थंडी/उष्णता लावणे टाळा

• लांब काळ चालणे किंवा अनवधानाने हालचाल करणे टाळा

गुडघेदुखीसाठी बसण्याची सर्वोत्तम स्थिती कोणती आहे!

गुडघेदुखीसाठी बसण्याची योग्य आणि आरामदायी स्थिती खूप महत्त्वाची आहे. चुकीच्या स्थितीत बसल्यास दुखणे वाढू शकते आणि गुडघ्यांवर अधिक ताण येऊ शकतो. गुडघेदुखीसाठी बसण्याची सर्वोत्तम स्थिती : सोप्या खुर्चीत सरळ बसणे, पाय उंच ठेवणे, लांब काळासाठी बसणे टाळा, पॅड किंवा उशी वापरणे, पाय क्रॉस न करता सरळ ठेवणे चांगले.

पाय ओलांडल्याने गुडघे का दुखतात!

Leg pain ( पाय दुखी )
Knee pain

पाय ओलांडल्यास गुडघ्यांवरचा दाब असमान पसरतो. यामुळे गुडघ्याच्या सांध्यावर ताण येतो आणि दुखणे सुरू होऊ शकते. जर गुडघ्यात आधीपासूनच जखम, अर्थराइटिस किंवा सूज असेल, तर पाय ओलांडल्याने वेदना वाढतात.

गुडघेदुखीवर रामबाण उपाय!

काही नैसर्गिक आणि सोप्या उपायांनी तुम्ही हे दुखणे कमी करू शकता.

गरम पाणी किंवा हिट पॅक

साधा व्यायाम

हळदीचे दूध

संतुलित आहार

हर्बल किंवा नैसर्गिक तेल

योगा आणि स्ट्रेचिंग 🙁 वृक्षासन, भुजंगासन, शिशुपासन यासारखे योगासन गुडघ्याला बळकटी देतात)

पाय दुखण्याच्या पद्धती!!!

• गुडघ्याच्या खाली दुखणे
• गुडघ्याची गादी फाटणे
• गुडघ्याच्या मागे दुखणे
• गुडघ्याच्या खाली पाय दुखणे
• एकच पाय दुखणे
• रात्री पाय दुखणे


गुडघ्याच्या खाली दुखणे
कारणे: पॅटेला किंवा हाडाच्या खालील स्नायू आणि टेंडनमध्ये ताण, घामट किंवा संधिवात होने.

उपाय = हलके स्ट्रेचिंग आणि घामट मसाज करा


गुडघ्याची गादी फाटणे
कारणे: स्नायू किंवा लिगामेंटची ताण, ओसाडेपणा, जाड वजन

उपाय: हलके व्यायाम आणि योगा करा


गुडघ्याच्या मागे दुखणे
कारणे: हॅमस्ट्रिंग स्नायू ताणणे, लिगामेंट इजा, बर्सायटिस होने

उपाय: स्थानिक जेली किंवा क्रीम लावून मसाज करा


गुडघ्याच्या खाली पाय दुखणे
कारणे: पॅटेला ट्रॅकिंग समस्या, सायटिका किंवा ताणलेले स्नायू दुखणे

उपाय: गुडघ्याला सपोर्ट करणे
हलके चालणे किंवा फिजिओथेरपी घेणे…


एकच पाय दुखणे
कारणे: एकसंध संधिवात, इजा, हाडाची कमी घर्षण होने

उपाय: डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.


रात्री पाय दुखणे
कारणे: ऑस्टियोआर्थ्रायटिस, लवकर स्नायूंचे कडकपणा, रक्तसंचार कमी होणे

उपाय: रात्री हलके स्ट्रेचिंग
गरम पॅक किंवा हलके मसाज करून घेणे