Dry fruits वैशिष्ट्ये =
Dry fruits खाल्ल्याने ताकत आणि मेंदूची शक्ती वाढते असे मानले जाते. सुका मेवामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात तसेच स्मरणशक्तीची असो वा पचनशक्तीची, पोटातील गॅससंबंधित असो किंवा बद्धकोष्ठासंबंधित ड्राय फ्रुट्स उपाय म्हणून कार्य करत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ आहारात सुक्या मेव्यांचा समावेश करण्यावर विशेष भर देतात. Dry fruits खाल्ल्याने शरिरातील वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन होते…
Dry fruits : बदाम, काजू, अक्रोड, मनुका, अंजीर, खजूर व पिस्ता यांसारखे सुके मेवे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. नियमित प्रमाणात ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने भरपूर फायदे होतात. दवाखाना ला लाखों रुपये खर्च झाल्यानंतर आपण ड्राय फ्रुटस खायला लागतो. दवाखान्या येण्याच्या अगोदर आपण ड्रायफ्रूट खाण्यास चालू केलं तर अनेक फायदे आपल्या शरीरावरती होतात. ड्रायफ्रूट ( Dry fruits ) मध्ये अनेक गुणधर्म आहेत जसं की अँटिऑक्सिडंट, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी घटक असतात यातून आपणाला अनेक फायदे होतात, शरीरात ऊर्जा वाढवणे, हाडांची ताकद वाढवणे, रक्ताची वाढ व रक्ताची शुद्धीकरण करणे, शरीरात ताकदीचे प्रमाण वाढ करणे इत्यादी अनेक फायदे आपल्याला भेटतात…
मधुमेहासाठी सुक्या मेव्याचे फायदे (Diabetes Dry Fruits Benefits in Marathi)

मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांसाठी सुकामेवा हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास तो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. सुक्या मेव्यामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने मधुमेहासाठी तो लाभदायक ठरतो.
गर्भावस्थेत सुका मेवा खाण्याचे फायदे | Dry Fruits Benefits in Pregnancy in Marathi

गर्भावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ असतो. या काळात योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर व तज्ज्ञांच्या मते, सुका मेवा (Dry Fruits) हा गर्भवती महिलांसाठी पोषणाचा उत्कृष्ट स्रोत आहे. बदाम, काजू, अक्रोड, खजूर, अंजीर, मनुका इत्यादी सुका मेवा खाल्ल्याने आई व बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते.
प्रमुख Dry – fruits आणि त्यांचे फायदे:

खजूर ( खारीक) :
ऊर्जा वाढवतात आणि शरीराला आवश्यक ऊर्जा देतात, तसेच पचन सुधारतात.
अंजीर :
फायबरचा चांगला स्रोत, जे पचनासाठी आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे
बदाम :
अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण, जे वृद्धत्व टाळण्यास मदत करते.
अक्रोड :
मेंदूच्या आरोग्यासाठी आणि संज्ञानात्मक कार्यासाठी फायदेशीर आहे.
पिस्ता:
लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांचा चांगला स्रोत आहे.
मनुका :
नैसर्गिक साखरेमुळे शरीराला त्वरित उर्जा मिळते. मनुका मुळे कोलेस्टेरॉल कमी ठेवण्यास मदत करते….
✅ ड्रायफ्रूट खाण्याची पद्धत….
ड्रायफ्रूट खाण्याचे योग्य पद्धत म्हणजे रात्री सर्व ड्रायफ्रूट्स दुधात भिजवून खाण्याचे फायदे अनेक पटीने फायदेशीर ठरते. अनशापोटी / रिकाम्या पोटी खाल्ल्याने भरपूर ऊर्जा व दिवसभरासाठी ताकद मिळते dry fruits भिजून खाल्ल्याने त्यामध्ये पोषक तत्व जास्त वाढतात
zakastimes.Com


One reply on “Dry fruits benifits in Marathi:”