हृदयविकार हे अनेक लोकांचा गंभीर विषय झाला आहे. एक महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या 6 चिन्हे जाणून घेऊयात. हृदयविकार (Heart Attack) हा आजार अचानक होत नाही. त्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देत असतो. दुर्दैवाने आपण हे संकेत दुर्लक्षित केल्यामुळे मोठा धोका निर्माण होतो. संशोधनानुसार हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी साधारण एक महिना आधीच शरीर काही लक्षणे दाखवते.
हृदयविकाराचे ६ महत्त्वाचे सुरुवातीचे लक्षणे 👇

1. छातीत वेदना किंवा दडपण येणे.
2. श्वास घेण्यास त्रास होने.
3. अनावश्यक थकवा जनवणे.
4. शरीरात घाम येणे.
5. चक्कर येणे किंवा डोके हलके होणे
6. पचनाशी संबंधित समस्या होने.
छातीत वेदना किंवा दडपण (Chest Pain / Pressure)
हृदयविकाराचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत जडपणा, वेदना किंवा दडपण जाणवणे. ही वेदना हात, मान, पाठ किंवा जबड्यापर्यंत पसरू शकते.
👉 जर अशी वेदना वारंवार होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
श्वास घेण्यास त्रास (Shortness of Breath)
जरा चाललं, जिने चढले किंवा हलकीशी हालचाल केली तरी श्वास घेण्यास त्रास होणे हा हृदयविकाराचा सुरुवातीचा इशारा असू शकतो. याकडे बारकाईने लक्ष द्या.
अनावश्यक थकवा जनवणे (Unusual Fatigue)
विशेष काम न करता पण सतत थकवा जाणवणे, उठल्याबरोबरच शरीरात ऊर्जा नसणे, हे हृदयाशी संबंधित समस्या दर्शवू शकते. महिलांमध्ये हे लक्षण अधिक आढळते.
शरीरात घाम येणे (Sweating)
थंड हवामान असतानाही जास्त घाम येणे किंवा अचानक घाम फुटणे, हा हृदयविकाराचा इशारा असतो. विशेषतः रात्री झोपेतून उठल्यावरही घाम येत असेल तर लक्ष द्यावे.
चक्कर येणे किंवा डोके हलके होणे (Dizziness)
अचानक चक्कर येणे, डोकं हलके होणे किंवा बेशुद्ध पडण्यासारखी अवस्था निर्माण होणे हे हृदयाच्या रक्तपुरवठ्यातील अडथळ्याचे लक्षण असू शकते. मग याकडे लक्ष देऊन आपली काळजी करणं महत्त्वाचे आहे.
पचनाशी संबंधित समस्या!
पोटात जडपणा, अपचन, मळमळणे, ओकारी येणे यांसारखी लक्षणेही हृदयविकारापूर्वी दिसतात. लोक याला सहसा गॅस्ट्रिक प्रॉब्लेम समजतात, पण हे हृदयविकाराचे संकेत असू शकतात.
हार्ट अटॅक आल्यावर काय करावे: Heart attack alyavar kay karave in marathi
हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होणे, अटॅक आल्यानंतर माणसाला भीती वाटायला सुरू होते. त्यामुळे हार्ट अटॅकच्या वेळी तात्काळ योग्य उपाय करणे महत्त्वाचे आहे. शांत राहा आणि लगेच मदत मागवा, रुग्णाला आरामदायी स्थितीत बसा, जवळ असल्यास Aspirin (300 mg चघळून घ्या), वाहनाने स्वतः रुग्णालयात जाणे टाळा.
हृदयविकार टाळण्यासाठी काय करावे?
• नियमित व्यायाम करा
• तणाव कमी ठेवा
• तळलेले, तेलकट व जंक फूड टाळा
• धूम्रपान व मद्यपानापासून दूर रहा
• नियमित तपासणी करून घ्या
स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे!!
स्त्रियांमध्येही मोठ्या प्रमाणावर आढळणारी गंभीर समस्या झाली आहे. अनेक वेळा स्त्रियांना हृदयविकाराची लक्षणे वेगळी असतात जसे की जबडा व खांद्यामध्ये वेदना, छातीत वेदना किंवा जळजळ, श्वास घेण्यास त्रास, उलटी होणे किंवा पोटात दुखणे जवळपास असे लक्षणे दर्शवतात.
हृदयविकाराचा झटका नेहमीच गंभीर असतो का?
हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा अनेक वेळा गंभीर असतो, कारण तो थेट हृदयाच्या स्नायूंवर परिणाम करतो. मात्र, प्रत्येक झटका एकसारखा नसतो. काही प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात आणि व्यक्ती वेळेवर उपचार घेतल्यास धोका टाळता येतो. पण उपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. हृदयविकाराचा झटका गंभीर असला की रक्तपुरवठा थांबतो, हृदयाचे स्नायू नुकसान होतात.
हृदयविकाराचा झटका आल्यास काय करू नये?
हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यास काही चुकीची पावले उचलल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते. Heart attack आल्यास विलंब करू नका, स्वतः वाहन चालवू नका, जास्त शारीरिक हालचाल करू नका, घाबरू नका व इतरांना घाबरवू नका हृदय विकार आल्यानंतर या गोष्टी करू नये.
कोणते फळ हृदय शुद्ध करते: Which fruit cleanses the heart

•डाळिंब (Pomegranate)
•सफरचंद(Apple)
•संत्रे व लिंबूवर्गीय फळे(Citrus Fruits)
•द्राक्षे (Grapes)
•पपई (Papaya)
हे हृदयासाठी फायदेशीर ठरते!
हृदय हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयव आहे. योग्य आहार घेतल्याने हृदय निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. काही फळांमध्ये असे नैसर्गिक घटक (antioxidants, fiber, vitamins, minerals) असतात जे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून हृदय शुद्ध करतात व धमन्या स्वच्छ ठेवतात.
कोलेस्ट्रॉलसाठी कोणते गरम पेय हानिकारक आहेत?
कोलेस्ट्रॉल वाढवणारी हानिकारक❌ गरम पेये
• जास्त साखर घातलेला चहा( Milk Tea with Sugar)
• क्रीमसह कॉफी (Coffee with Cream & Sugar)
• हॉट चॉकलेट (Hot Chocolate)
• पॅकेज्ड गरम ड्रिंक्स (Packaged Hot Drinks)
• पॅकेज्ड गरम ड्रिंक्स (Packaged Hot Drinks)
कोलेस्ट्रॉलसाठी चांगले गरम पेय (पर्याय)
✅ ग्रीन टी
✅ हर्बल टी
✅ ब्लॅक कॉफी
✅ हळदीचे दूध
या गोष्टीचा कोलेस्ट्रॉल साठी फायदेशीर ठरतात!
हृदयरोग असल्यास कोणते फायदे मिळवू शकतो?
हृदयरोग आल्यावर लोक आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागतात. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, आणि ब्लड शुगर तपासणे यावर लक्ष दिले जाते म्हणून आरोग्याबाबत सजगता वाढते जसेकी जीवनशैलीत सुधारणा होते, शरीराचे गुणवत्ता, औषधोपचार व उपचारांची माहिती मिळते, जीवनाची गुणवत्ता सुधारते, कुटुंब आणि सामाजिक आधार मिळतो, धोके ओळखण्याची क्षमता यातून मनुष्य सतर्कता बाळगतो.
हृदयासाठी कोणता आहार सर्वोत्तम आहे?

(Good health )हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार खूप महत्वाचा आहे. योग्य आहारामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो, रक्तदाब संतुलित राहतो आणि हृदयविकाराच्या जोखमी कमी होतात. त्यामुळे हृदयासाठी सर्वोत्तम आहार महत्वपूर्ण ठरते जसे की फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, हृदयासाठी निरोगी फॅट्स, प्रोटीनयुक्त पदार्थ जसेकी: डाळी, हरभरा, मूग, सोयाबीन, कमी फॅटयुक्त कोंबडी/मासे.
